...

pune rajiv gandhi zoo। राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅन तयार करा :  नवल किशोर राम

pune rajiv gandhi zoo। पुणे : पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन मास्टर प्लॅनच्या विकास प्रकल्पांची पाहणी केली. मुख्य प्रवेशद्वाराजवळील प्रस्तावित एन्ट्रन्स प्लाझा प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.  आयुक्त राम यांनी प्राणीसंग्रहालयातील वन्यप्राणी, त्यांच्या निवासव्यवस्था, दैनंदिन व्यवस्थापन, आरोग्यसेवा, तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध सेवा-सुविधा यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी पर्यटकांच्या अनुभवात सुधारणा घडवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थापन सक्षम करणे, वाहनतळ क्षमता वाढवणे आणि लहान मुलांसाठी सुविधांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले. 

 

आयुक्तांनी सांगितले की, प्राणीसंग्रहालयातील सर्पोद्यान प्रकल्प पूर्ण करून बर्ड पार्क प्रकल्पाची त्वरित सुरुवात करावी. तसेच, 130 एकर परिसराचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून विविध प्रकारचे प्राणी ठेवणे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, नियोजित आराखड्याची जलद गतीने अंमलबजावणी केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल आणि महसुली उत्पन्न सुधारेल. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रस्तावित प्रकल्प तातडीने राबवण्याचे आदेश दिले.

नवल किशोर राम यांनी सांगितले की, स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची संख्या वाढून महसुली उत्पन्न वाढावे यासाठी प्राणिसंग्रहालयाच्या नियोजित आराखड्याची जलद गतीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या. प्राणीसंग्रहालयातील आधुनिक सर्पोद्यान प्रकल्प पूर्ण करून बर्ड पार्क प्रकल्पाची त्वरित सुरवात करावी. प्राणी संग्राहालायास भेट देणाºया नागरिकांच्या वाहनांसाठी वाहनतळांची व्यवस्था अधिक सक्षम करून त्याची क्षमता वाढविण्याची गरज असल्याचे नमूद केले.

पर्यटकांना विशेषत: लहान मुलांना उपलब्ध असलेल्या सुविधा चांगल्या असल्या तरी सदर सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी काम करावे. प्राणी संग्रहालयाचा परिसर १३० एकरामध्ये पसरलेला आहे. सर्वात मोठे नैसर्गिक पाण्याचे तळे येथे आहे. येथे उपलब्ध जागेचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येऊ शकतो. त्यासाठी काम केले पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी येथे आणले पाहिजे. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. येथे मनुष्यबळ देखील कमी आहे. प्राणी संग्रहालयात आवश्यक असलेल्या सर्व विषयांवर प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या आहेत, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या मास्टर प्लॅनच्या विकास प्रकल्पांची पाहणी करून मुख्य प्रवेशद्वार एन्ट्रन्स प्लाझा, सर्पोद्यान व बर्ड पार्क प्रकल्प जलद अंमलबजावणीसाठी आदेश दिले.

Local ad 1