...

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम अ‍ॅक्टीव्ह मोडवर ; प्रशासनात मोठा खांदेपालट

पुणे, २० सप्टेंबर २०२५ : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनात मोठा खांदेपालट करत विविध उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांच्या जबाबदाऱ्या बदलल्या. तसेच विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) पदाची निर्मिती करून प्रसाद काटकर यांची नियुक्ती केली आहे. उपायुक्तांच्या बदल्या करून काही पदांवर राज्य सरकारकडून प्रति नियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लावली. महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी वार रुम आणि नियमित आढावा बैठक सुरु केली. स्वच्छता व प्रकल्प व्यवस्थापनावर प्रमुख लक्ष देण्यात आले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी (OSD), महापालिकेत प्रथमच OSD पदाची निर्मिती करण्यात आली. प्रसाद काटकर यांची OSD म्हणून नियुक्ती; त्यांना निवडणूक विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली. या नियुक्तीमुळे प्रशासनिक कामकाज अधिक केंद्रीकृत व प्रभावी होणार आहे. (pune municipal commissioner reshuffle 2025)

 

नांदेडमध्ये अतिवृष्टी पीक नुकसानग्रस्त शेतक-यांना १००% मदत निधी मंजूर ; ५५३ कोटी रुपये थेट खात्यात

 

महत्त्वाच्या उपायुक्तांची बदल्या

1. माधव जगताप : अतिक्रमण व मिळकत कर विभागाचे उपायुक्त; यांना आकाश चिन्ह, परवाना विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मंडई विभागाची जबाबदारी दिली गेली.
2. रमेश शेलार : अतिक्रमण निर्मुलन व अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाचे प्रमुख; मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून खलाटे यांना सहाय्यक म्हणून काम करावे लागणार.
3. निखिल मोरे : भूसंपादन व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त.
4. वसुंधरा बारवे : प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाची जबाबदारी.
5. जयंत भोसलेकर : समाज कल्याण विभागाचे उपायुक्त; वाहन विभागाची जबाबदारी रवी पवार यांच्याकडे.
6. अरविंद माळी : मध्यवर्ती भांडार.
7. सहाय्यक उपायुक्त म्हणून कुणाल धुमाळ, सोमनाथ आढाव, सुचिता पानसरे, राजेश गुर्रम, अशोक भवारी यांची नियुक्ती विविध क्षेत्रीय कार्यालयांवर केली.

 

 

प्रशासनातील उद्दिष्ट

* प्रशासनात हा खांदेपालट महापालिकेतील कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि जलद करण्यासाठी करण्यात आला.
* स्वच्छता, वाहतूक, अतिक्रमण निर्मुलन, प्रकल्प व्यवस्थापन आणि समाज कल्याण यावर विशेष लक्ष देण्याचे उद्दिष्ट.
* वार रुम आणि OSD पदाच्या माध्यमातून प्रकल्पांचा सातत्यपूर्ण आढावा घेणे शक्य होणार आहे.

 

Local ad 1