...

पुण्यात पाणी संकट गडद? पाणी कपात चर्चेला PMC आयुक्तांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी नकार

पुणे : खडकवासला धरण (Khadakwasla dam) साखळी प्रकल्पातून पुणे महापालिकेला दरवर्षी ११.६० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिका १७ टीएमसीहून अधिक पाणी वापरत (PMC water usage) असल्याचे समोर आले आहे. या अतिरिक्त वापरावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक आयोगाने (Maharashtra water authority) १० टक्के पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Zilla Parishad Elections 2025। जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांना हिरवा कंदील : नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे (Irrigation department) अधिकारी शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र, आयुक्तांनी “पाणी कपातीच्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करू शकत नाही” असे स्पष्ट सांगत बैठक टाळली. परिणामी, अधिकाऱ्यांना केवळ पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी चर्चा करून रिकाम्या हाताने परतावे लागले.

पाटबंधारे विभागाकडून पुणे महापालिकेला अनेक वेळा १० टक्के पाणी वापर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण महापालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वारंवार दिलेल्या इशाऱ्यानंतर ही सुधारणा न झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता पाटबंधारे विभागावर कारवाईचा दबाव आणला आहे.

 

Bike Taxi Service in Maharashtra।”Uber, Rapido ला परवाना ; बाईक-टॅक्सीचे दर जाहीर

 २०३१ पर्यंतचा आराखडा, पण वापर जास्त

पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे की, २०३१ पर्यंत पुण्याची लोकसंख्या ७६ लाख १६ हजार इतकी होईल. त्यासाठी १४.६१ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. पण महापालिकेचा प्रत्यक्ष वापर या मर्यादेपेक्षा जास्त आहे.

गेली काही वर्षे महापालिकेने केलेला पाणी वापर (टीएमसीमध्ये):
* २०२१ : २२.१९
* २०२२ : २२.७१
* २०२३ : २२.७७
* २०२४ : २०.९९
* २०२४-२५ : २२.१

पाणी कतीला होईल मोठा विरोध
जानेवारी २०२६ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणार असल्याची शक्यता आहे. अशा वेळी जर जॅकवेल पंपहाऊसचे नियंत्रण पाटबंधारे विभागाकडे गेले, तर शहरातील दररोजचा पाणीपुरवठा ३० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. परिणामी, दिवसाआड पाणी द्यावे लागू शकते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी संकट गडद होण्याची शक्यता आहे.

“जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. त्यात त्यांनी जलसंपत्ती नियामक आयोगाच्या आदेशानुसार १० टक्के पाणी कपात करा तसेच खडकवासला येथील जॅकवेल पंप पाटबंधारे विभागाच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. मात्र, या दोन्ही मागण्या मान्य करता येणार नाहीत. या संदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येईल.”
– नंदकुमार जगताप, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका

Local ad 1