...

PMC Parking Policy Pune 2025 । सात वर्षे रखडलेले धोरण आता लागू होणार ; पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

PMC Parking Policy Pune 2025 पुणे. महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी देऊनही गेली सात वर्ष अडगळीला पडलेल्या सार्वजनिक वाहनतळ धोरणाची (पे अॅण्ड पार्क) अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्यात शहरातील सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पे अँड पार्किंग सुरू करण्यासंदर्भात लवकरच आयुक्त स्तरावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज यांनी दिली.

 

Waqf Amendment Act 2025 । तीन तरतुदींवर स्थगिती, मिस फरहा फाउंडेशनची महत्वाची भुमिका

 

शहरातील वाहनांची वाढती संख्या रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली शहरातील रस्त्यांवर पे अॅण्ड पार्क धोरण राबविण्याचा घाट महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी व प्रशासनाने २३ मार्च २०१८ मध्ये घातला होता. याला भाजप वगळता सर्व विरोधी पक्ष आणि विविध समाजसेवी संस्थांनी विरोध करत जोरदार आंदोलने केली. या धोरणास मंजुरी देण्यासाठी आयोजित केलेल्या मुख्य सभेवेळी महापालिकेच्या सर्व गेटवर विविध आंदोलने सुरू होती. गेट व दरवाजांना कुलूप लावून त्यावेळी सभा घेण्यात आली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?

 

पुणेकरांची वाढती नाराजी लक्षात घेऊन प्रस्ताव मागे न घेतला उपसूचना देऊन प्रमुख पाच रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी ही योजना राबविण्याचा मार्ग सत्ताधाऱ्यांनी अवलंबला. हे पाच रस्ते निवडण्याचा अधिकार महापौरांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आला. त्यानंतर पालिका प्रशासनाने शहरातील जवळपास ३८ रस्त्यांचा सर्व्हे करून त्यातील पाच रस्ते निवडण्याचा प्रस्ताव महापौर कार्यालयास दिला. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी अनेक स्मरणपत्रे दिली. मात्र, विविध निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गेली सात वर्षे या प्रस्तावावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.

 

मराठी संशोधकाचा जागतिक पराक्रम ; ‘कोलंबियात विकसित स्टार’ प्रणालीमुळे निपुत्रिक दांपत्याला मिळाली गोड बातमी

 

दरम्यान, शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षापूर्वी एका सामाजिक संघटनेने नगरविकास विभागाला याबाबत तक्रार केली होती. त्यावर नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला खुलासा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने शहरातील ३२ रस्त्यांचा अभ्यास करून यापैकी सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर पे अँड पार्किंग धोरण राबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सर्वसाधारण सभा सध्या अस्तित्वात नसल्यामुळे राज्य सरकारने याबाबत निर्णय घेऊन महापालिका प्रशासनाला कळवावे, अशी विनंती केली होती.

 

video.. अबब ! लोणी काळभोरमध्ये तब्बल 180 मिमी पाऊस

 

मात्र, नगर विकासनेही यावर काहीच कळविले नाही. त्यानंतर आता महापालिका प्रशासनानेच नगरविकासला पाठवलेल्या प्रस्तावातील औंध डीपी रस्ता व कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता हे दोन रस्ते वगळून लक्ष्मी रस्ता व बिबवेवाडी रस्ता या दोन रस्त्यांचा समावेश करत सहा रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर पे अँड पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचा दावा आहे की व्यापारी पेठा व जास्त रहदारी असलेल्या रस्त्यांवर पार्किंगचे नियमन झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल.

 

🚗 सहा रस्त्यांवर पे अॅण्ड पार्किंग

जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर या रस्त्यांच्या समावेश आहे.

 

💰 पार्किंग शुल्क
चारचाकी वाहनांसाठी : प्रति तास ₹10, ₹15 व ₹20
दुचाकी वाहनांसाठी : प्रति तास ₹2, ₹3 व ₹4

 

 

PMC Parking Policy Pune 2025
PMC Parking Policy Pune 2025

 

चौक व रस्ते होणार मोकळे

शहरातील ४५ रस्ते नो-हॉकर्स झोन आणि ३०० हून अधिक चौकांमध्ये ५० मीटर नो – पार्किंग झोन करण्यात येणार आहेत. पोलिसांनी आधीच कॅमेऱ्यांच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे. यामुळे चौक मोकळे होऊन वाहतुकीची गती वाढेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. पुणेकरांसाठी मात्र हा निर्णय आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. मोफत रस्ते पार्किंगऐवजी आता नागरिकांना प्रत्येक तासाला शुल्क मोजावे लागणार आहे.

Local ad 1