...

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान : महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष शिबिरे

नांदेडमध्ये १७ सप्टेंबरला उद्घाटन

नांदेड, दि. १३ सप्टेंबर : देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ राबविण्यात येणार आहे. महिला आणि मुलांच्या आरोग्य सेवांच्या गरजा लक्षात घेऊन हे अभियान आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये स्तरावर आयोजित केले जाईल. (Swasth Nari Sashakt Parivar Abhiyan)

 

 

MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव

 

या अभियानाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन १७ सप्टेंबर रोजी मध्यप्रदेशातील इंदोर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्याच दिवशी नांदेड येथील स्त्री रुग्णालय, श्याम नगर येथे प्रातिनिधिक उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

 

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

 

अभियान काळात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये महिलांच्या तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील. यामध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग तपासणी, प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण, किशोरवयीन मुलींची तपासणी, क्षयरोग तपासणी, रक्तदान शिबिरे तसेच आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना या सुविधा उपलब्ध असतील.जिल्ह्यातील महिला, किशोरवयीन मुली तसेच नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे.

Local ad 1