...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत रविवारी फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिला दीक्षांत समारंभ 

पुणे : शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेसाठी कार्यरत फ्यूएल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स ग्रुप अंतर्गत फ्यूएल बिझनेस स्कूलचा पहिला दीक्षांत समारंभ रविवारी (१४ सप्टेंबर २०२५) सायंकाळी ६ वा. फॉरेस्ट ट्रेल, भूगाव, पुणे येथे पार पडणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे असतील. यावेळी २०० विद्यार्थ्यांना सीएसआर शिष्यवृत्ती तसेच पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत.

या सोहळ्यात गडकरी पीजीडीएम (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स) या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करतील. “वन व्हिजन, वन मिशन, स्किल्ड नेशन” या तत्वांवर आधारित फ्यूएलचा १९ वा वर्धापन दिनही यानिमित्त साजरा केला जाणार आहे.

डॉ. केतन देशपांडे (अध्यक्ष व सीईओ, फ्यूएल) यांनी माहिती दिली की, अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि सीएसआर समर्थित सर्टिफिकेट कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना पदवी व प्रमाणपत्रे देण्यात येतील. सीएसआर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना *डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम लीडरशिप अवॉर्ड* देण्यात येणार आहे. तसेच कॉर्पोरेट प्रतिनिधींच्या उपस्थितीत सीएसआर व एचआर विषयक पॅनल चर्चा होणार आहे.

फ्यूएलला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली असून, पंतप्रधानांकडून *चॅम्पियन्स ऑफ चेंज* पुरस्काराने संस्थेचा गौरव करण्यात आला आहे. अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनासोबत युवक सक्षमीकरण आणि कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

१९ वर्षांच्या प्रवासात फ्यूएलने अनेक पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना बळ दिले आहे. फ्यूएल स्किलटेक युनिव्हर्सिटीसाठी *सिप्ला*चे अध्यक्ष डॉ. युसुफ हमीद यांनी समर्थन दिले असून, त्याद्वारे देशातील युवकांसाठी जागतिक दर्जाच्या शिक्षण आणि कौशल्यविकास संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Local ad 1