Orange Alert in Nanded । नांदेड, प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी नांदेड जिल्ह्यासाठी १३ सप्टेंबर २०२५ रोजी एक दिवसासाठी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केला आहे. तसेच १२, १४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२५ या चार दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १४, १५ व १६ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
खबरदारीचे उपाय
✅ विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाणे टाळा.
✅ सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या, छत, ओटा किंवा उघड्यावर थांबू नका.
✅ घरातील विद्युत उपकरणे तत्काळ बंद करा.
✅ तार, लोखंडी वस्तू, खांब यापासून दूर रहा.
✅ पाण्यात असल्यास लगेच बाहेर पडा.
Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
करू नये अशा गोष्टी
❌ विजांचा कडकडाट होत असताना लँडलाईन फोन, शॉवर, पाण्याची पाईपलाइन वापरू नका.
❌ लोखंडी तंबू, शेड किंवा उंच झाडाखाली आसरा घेऊ नका.
❌ धातूंच्या मनोऱ्याजवळ जाऊ नका.
❌ खिडकीतून किंवा दारातून वीज पडताना पाहू नका.