...

Pune ZP election । पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी होणार चुरस ; आध्यक्षपदाचे आरक्षण घ्या जाणून 

Pune ZP election । पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अखेर खुले झाले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर जिल्हा परिषदेतील हे पद सर्वसाधारण गटासाठी खुलं करण्यात आलं आहे. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितींच्या सभापतींसाठी आरक्षणाची अधिसूचना जाहीर केली असून, त्यात हा बदल स्पष्ट झाला आहे. राज्यातील एकूण आठ जिल्हा परिषदेची अध्यक्षपदे खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत, तर १८ जिल्हा परिषदेची अध्यक्षपदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाली आहेत.

 

 

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

 

२०२२ च्या कार्यकाळानंतर सुरू झालेली प्रतीक्षापुणे जिल्हा परिषदेचा कार्यकाळ २०२२ मध्ये संपल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली होती. त्यावेळी जाहीर झालेल्या आरक्षणानुसार पुण्यास सर्वसाधारण गटातून अध्यक्ष मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. नव्याने जाहीर झालेल्या अधिसूचनेतही हेच आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. आरक्षणाची अंमलबजावणी आगामी पंचवार्षिक निवडणुकीनंतर होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून होणार आहे. हे आरक्षण अडीच वर्षे लागू राहणार आहे. त्यामुळे आता पुढील अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण गटातून उमेदवार निवडले जाणार आहेत.

 

EB-5 Visa India । अमेरिकेच्या व्हिसासाठी ‘ईबी-५’चा पर्याय : कशी मिळते ग्रीन कार्डची संधी

 

प्रदीप कंद यानंतर पहिल्यांदाच खुलं पदमाजी अध्यक्ष प्रदीप कंद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पहिल्यांदाच हे पद खुलं होत आहे. यापूर्वी हे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे इच्छुक नेत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.निवडणुका लांबणीवर, प्रशासक कालावधी सुरू२०२२ मध्ये आरक्षण जाहीर होऊनही निवडणुका लांबणीवर पडल्या. आरक्षणाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे गेल्या काही काळापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक कालावधी सुरू आहे. आता अध्यक्षपद खुले झाल्याने, तसेच गट व गण आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर, निवडणूक राजकारणाला वेग येण्याची चिन्हे आहेत.

Local ad 1