...

महापालिकेच्या ७५ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित होणार

आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती

पुणे : प्रशासकीय सुधारणा केल्यानंतर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता शिक्षण क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेच्या ७५ शाळा ‘मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच समाविष्ट गावांतील शाळांच्या इमारती व सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

 

आयुक्त राम यांनी आज शिक्षण मंडळाच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन शाळांची सद्यस्थिती तपासली. शाळांची इमारती, मैदाने, भौतिक सुविधा तसेच शिक्षकांची माहिती त्यांनी घेतली.

 

बालआधार कार्ड : शाळा प्रवेश, लसीकरण व आरोग्य सेवांसाठी आवश्यक ओळखपत्र

 

पहिल्या टप्प्यात ७५ शाळांवर लक्ष केंद्रीत करून दर्जेदार शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. केवळ पायाभूत सुविधा नव्हे, तर शिक्षणाचा दर्जाही उंचावण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देणारे उपक्रम राबवले जातील.

 

पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?

 

समाविष्ट ३२ गावांतील शाळांची जबाबदारीही महापालिकेकडे आली आहे. मात्र, त्यांची इमारती व मैदानांची अवस्था समाधानकारक नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व आवश्यक सोयी उपलब्ध करून त्या शाळांचे दर्जेदार विकासकाम करण्यात येईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

Local ad 1