सासवडमध्ये १ कोटी ३३ लाखांचा मद्यसाठा जप्त; कंटेनर चालक अटकेत
पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली माहिती
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड भरारी पथकाने वीर फाटा (जेजुरी-सासवड रोड, पुरंदर) येथे केलेल्या कारवाईत १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपयांचा मद्यसाठा आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. ही माहिती पुणे विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. (sasanvad madhya satha japt pune july 2025)
हडपसर ते यवत उड्डाणपूल प्रकल्पाला गती ; २२ ऑगस्टला निविदा उघडणार
पथकाने सापळा रचून टाटा एलपीटी (१२१२) सहाचाकी मालवाहतूक कंटेनर (MH-४९-AT-३४७१) तपासले असता, त्यामध्ये गोवा बनावटीचे रॉयल ब्लु माल्ट व्हिस्कीचे ५७,७९२ बाटल्या (१८० मि.ली.) सापडल्या. एकूण १,२०४ बॉक्समध्ये हा मद्यसाठा आढळला. त्याची किंमत १ कोटी १५ लाख ५८ हजार ४०० रुपये असून, वाहन आणि मोबाईलसह एकूण जप्त मुद्देमाल १ कोटी ३३ लाख ७८ हजार ४०० रुपये इतका आहे.
या प्रकरणी वाहनचालकाविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास निरीक्षक संभाजी बरगे करीत आहेत.
महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !
राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीवर नियमित कारवाई सुरू असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीकरिता टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६०५८६३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.