...

हडपसर ते यवत उड्डाणपूल प्रकल्पाला गती ; २२ ऑगस्टला निविदा उघडणार

तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्पाला ही मिळणार गती

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर हडपसर ते यवत दरम्यान प्रस्तावित सहापदरी उड्डाणपूल (फ्लायओव्हर) प्रकल्पाला गती मिळणार आहे. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSIDC) मार्फत या प्रकल्पासाठी २२ ऑगस्ट २०२५ रोजी निविदा उघडल्या जाणार आहेत. यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली विविध उड्डाणपूल प्रकल्प राबवले जात आहेत.

 

महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !  

 

 

हडपसर-यवत फ्लायओव्हर प्रकल्पाचे वैशिष्ट्य

* पुणे-सोलापूर महामार्गाचे सहापदरीकरण
* सहा लेनचा उड्डाणपूल उभारणी
* दुसऱ्या टप्प्यात मेट्रो कॉरिडॉरसाठी राखीव जागा
* पुण्याच्या पूर्व भागातील वाहतूक समस्यांवर तोडगा

 

देशातील पहिली ‘क्रीडा नर्सरी’ पुणे महापालिका सुरू करणार

 

तळेगाव-चाकण-शिक्रापूर प्रकल्प

* तळेगाव ते चाकण मार्गाचे चौपदरीकरण
* चाकण ते शिक्रापूर मार्गाचे सहापदरीकरण
* तळेगाव ते चाकण दरम्यान चार पदरी उड्डाणपूल उभारणी
* औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा प्रकल्प

 

 

इतर सुरू असलेल्या निविदा प्रक्रिया

पुणे-शिरूर फ्लायओव्हर प्रकल्प : निविदा प्रक्रिया २४ जुलै २०२५ रोजी पूर्ण
नाशिक फाटा ते राजगुरुनगर (खेड) आठ पदरी उड्डाणपूल प्रकल्प (NHAI) : निविदा प्रक्रिया १ सप्टेंबर २०२५ रोजी पूर्ण होणार आहे.

 

 

Local ad 1