खुशखबर…रेल्वे तिकिट कन्फर्म होणार वेळेच्या आधी !
रेल्वे आरक्षणाचा तक्ता आता आठ तास आधी तयार होणार
नवी दिल्ली : लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांसाठी आरक्षण तक्ता पूर्वीप्रमाणे चार नव्हे तर आता आठ तास आधीच तयार केला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रवाशांना वेळेत माहिती मिळणार असून प्रवास नियोजन अधिक सुकर होणार आहे. (Railway Ticket Confirmation 8 Hours Before Reservation Chart)
नवीन प्रणालीनुसार, तिकीट वेटिंगमध्ये असलेल्या प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची आठ तास आधीच कल्पना येणार आहे. यामुळे अचानकच्या प्रवासात निर्माण होणाऱ्या अडचणी टाळता येणार आहेत.
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी : मिळकतकरात सवलत मिळविण्यासाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ
प्रति मिनिट १.५ लाख तिकीट बुकिंगची क्षमता
रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली (Passenger Reservation System – PRS) दर मिनिटाला १.५ लाख तिकीट बुकिंगची क्षमता आहे. आरक्षण प्रक्रियेत बदल करताना या प्रणालीला अधिक सक्षम करण्यासाठी सॉफ्टवेअर तज्ज्ञ आणि रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी सातत्याने काम करत आहेत.
राजकारण करा, पण मर्यादा पाळा – मस्तानी प्रकरणावर खसादार मेधा कुलकर्णींचा टोला
आरक्षण प्रक्रियेतील बदलांमुळे प्रवास अधिक सुलभ
पावसाळ्यातील हिरवळीतून धावणाऱ्या झुकझुकगाडीचं दृश्य जितकं मनमोहक, तितकंच आता रेल्वेचा प्रवासही सोयीस्कर होणार आहे. आरक्षण तक्ता लवकर तयार झाल्यामुळे गाड्यांच्या वेळा, तिकीट स्थिती याची अचूक माहिती आधी मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक विभाग यांच्यातील समन्वयाने ही प्रणाली राबवली जात असून, प्रवाशांना अधिक विश्वासार्ह सेवा देणे हेच या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट आहे.
Web Title : Train Ticket Confirmation Railway Reservation System