...

वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त शाळेला शालेय साहित्याची भेट 

 निवृत्त प्राचार्य बाबाराव नरवाडे यांचा समाजभिमुख उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी)  खुरगाव (ता. नांदेड) येथील जिल्हा परिषद शाळेला शालेय साहित्य, स्मार्ट बोर्ड आणि विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून दिवंगत वडील सटवाजी नरवाडे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त निवृत्त प्राचार्य बाबाराव नरवाडे यांनी समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. 

 

सुमारे पाच दशकांपूर्वी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी व शेतमजुरी करून आपल्या मुलांना शिक्षण देणारे दिवंगत सटवाजी नरवाडे यांनी खुरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बाबाराव यांचे प्राथमिक शिक्षण घडवले. या ऋणातीत भावना जपत बाबाराव नरवाडे यांनी शाळेला स्मार्ट बोर्ड, शालेय साहित्य तसेच विद्यार्थ्यांना खाऊ आणि शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले.

 

भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

 

या कार्यक्रमाला सरपंच प्रतिनिधी नारायणराव लेंडाळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अधिकारी सोनूणे, सदस्य रामराव धोंगडे, मुख्याध्यापक मुरलीधर सोनकांबळे, ज्येष्ठ नागरिक उमाजी नरवाडे यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन आकाश गाडगेराव यांनी केले.

 

पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक : ब्रिजमोहन पाटील अध्यक्ष, समीर सय्यद कार्यकारिणी सदस्यपदी विजयी

 

यावेळी बोलताना बाबाराव नरवाडे म्हणाले, “हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असताना माझे वडील म्हणजेच सटवाजी नरवाडे यांच्या त्यागामुळे आज मी प्राचार्य पदापर्यंत पोहोचलो. त्यांच्या स्मृतीनिमित्त शाळेस काहीतरी देणं हे माझं कर्तव्य आहे.”

 

 

कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक इंद्रजीत भिसे, आकाश गाडगेराव, विश्वनाथ होळगे, संजय इंगळे, राजकुमार घोंगडे, छाया मॅडम, स्नेहलता चिखलीकर मॅडम, अंगणवाडी सेविका, पोषण आहार मदतनीस शोभाबाई, ग्रामपंचायत कर्मचारी मन्मथ लेंडाळे आणि ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Web Title : Smrutidin Vadilanchya Smaranarth Koregaon Zp School Donation

Local ad 1