पुण्यात दहशतीसाठी वाहनांचे ‘खळखट्याक’ ; ५ महिन्यात ४० घटना, ४० अल्पवयीन आरोपी
दहशत आणि पूर्ववैमनस्यातून वाहन तोडफोडीचा सत्र सुरूच !
- ५ महिन्यात ४० घटना, १२२ आरोपी, ७२ अद्याप फरार
पुणे – पुण्यात शांतता व संस्कृतीचा चेहरा असलेल्या शहरात टोळक्यांच्या दहशतीमुळे वाहन तोडफोडीचे प्रकार चिंताजनक प्रमाणात वाढले आहेत. केवळ ५ महिन्यांत ४० घटनांची नोंद झाली असून, तब्बल १२२ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ७२ आरोपी अद्याप फरार आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे या घटनांमध्ये ४० अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. (pune vehicle attacks crime 2025)
भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
गुन्हेगारी टोळके ‘मीच भाई’ हे सिद्ध करण्यासाठी रस्त्यांवर वाहनांची तोडफोड करत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर होत आहे. सिंहगड रोड, वारजे, हडपसर, येरवडा, वानवडी, कोंढवा आणि चंदननगरसारख्या भागांमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांनी काही आरोपींची गुडघ्यावरून धींड काढून त्यांच्या ‘भाईगिरी’ला लगाम घालण्याचा प्रयत्न केला असला तरी या टोळक्यांच्या गुन्हेगारीला ब्रेक लागलेला नाही.
पुणे श्रमिक पत्रकार संघ निवडणूक : ब्रिजमोहन पाटील अध्यक्ष, समीर सय्यद कार्यकारिणी सदस्यपदी विजयी
या घटनांमुळे पोलिसांवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अचानक हल्ले करणाऱ्या टोळक्यांमुळे पोलिसांची उपस्थिती कमी, तर गुन्हेगारांची धास्ती अधिक वाटू लागली आहे. अल्पवयीन मुलांद्वारे गुन्हे करुन घेणे हा एक नवा धोकादायक ट्रेंड बनला आहे.
तोडफोडीच्या कारणांची पार्श्वभूमी
पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनांमागे सामाजिक, वैयक्तिक, टोळीविवाद आणि राजकीय मतभेद ही मुख्य कारणे आहेत. सोशल मीडियावरून उफाळून येणारे वादही प्रत्यक्ष हिंसाचारात परिवर्तित होत असल्याचे आढळले आहे.
वाहन फोडणाऱ्यांची ‘भाईगिरी’ रात्री दिसते
पोलिस वाहन तोडफोड प्रकरणातील आरोपींची खुलेआम धींड काढत आहेत. तरीही अशा घटनांचा आलेख वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाहन फोडणाऱ्यांची ‘भाईगिरी’ रात्री दिसते, पण सकाळी पोलिसांच्या गाडीतून त्यांची गुडघ्यावरून धिंड काढली जाते. मात्र हे उपाय कमी पडत असल्याचे चित्र आहे.