Yavatmal ACB Trap। तक्रारदाराने एक फोन केला अन् ‘चांदणी’ मॅडमचा करेक्ट कार्यक्रम झाला

Yavatmal ACB Trap । यवतमाळ : वडीलाच्या नावे असलेले स्वस्त धान्य दुकान तक्रारदार मुलगा याच्या नावे करण्यासाठी तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्यासाठी पुरवठा निरिक्षक चांदणी शेषराव शिवरकर (वय 32 ) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील दहा हजार पुर्विच घेतली.  उर्वरित दहा हजार रुपये देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावला. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 164 टोल फ्री नंबर वर फेना केला आणि चांदणी मॅडमचा करेक्ट कार्यक्रम झाला. (Yavatmal ACB Trap 10 हजार रुपयांची लाच स्विकारणारी महिला पुरवठा निरिक्षक अटक)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत यवतमाळ येते पुरवठा निरिक्षक चांदणी शेषराव शिवरकर असे या लाचखोर महिलेचे नाव आहे. शिवरकर या लाच मागत असल्याची तक्रार एका 42 वर्षिय व्यक्तीने केली होती. त्यानुसार सापळा लाववण्यात आला. त्यात चांदणी मॅडम या लाच घेताना एसीबीने अटक केली. ही कारवाई 24 मे रोजी  करण्यात आली.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 42 वर्षीय तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावाने रास्त भाव धान्य दुकान होते. तहसील कार्यालयात लवकर अहवाल सादर करण्यासाठी पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी चांदनी शिवरकर यांनी तडजोड करून अखेर 20000 रुपयांची मागणी केलेली होती. तक्रारदार यांनी दहा हजार रुपये यापूर्वीच त्यांना दिलेले असून उर्वरित दहा हजार रुपये याच्यासाठी त्यांनी तगादा केलेला होता त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 10 64 टोल फ्री नंबर वर संपर्क करून तक्रार नोंदवली. लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आलेले असून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
सदर कारवाई अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, पोलीस उपाधीक्षक संजय महाजन,  शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (Female supply inspector arrested for accepting bribe of Rs 10 thousand)
सरकारी पातळीवर कुणी लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री नंबर 1064 वर फोन करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आलेले आहे.
Local ad 1