...

शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात चक्का जाम आंदोलन

एक आंदोलकाचा जलसमाधीचा प्रयत्न

कोल्हापूरनागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ‘जमिनी आमच्या हक्काच्या’ अशा घोषणांनी मंगलवार (१ जुलै) रोजी कोल्हापुरातल्या पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला. शंखध्वनी करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस नेते सतेज पाटील, शिवसेना सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांच्यासह विविध पक्षीय नेते उपस्थित होते. “बळाचा वापर केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल” असा इशारा देखील देण्यात आला. (shaktipeeth mahamarg nished andolan kolhapur)

पुण्यातील पूररेषा लागू करण्याची याचिका फेटाळली ; अहवालानंतरच होणार अंतिम निर्णय

आंदोलनात जलसमाधीचा प्रयत्न

एक आंदोलक पंचगंगा नदीत उडी मारून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे क्षणिक गोंधळ निर्माण झाला होता.

महामार्ग ठप्प, पर्यायी वाहतूक मार्ग सक्रिय

सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी पर्यायी मार्गांवरून वाहने वळवली. कागल, इचलकरंजी, सांगली, पेठवडगाव, वाठारमार्गे वाहतूक सुरु ठेवण्यात आली. जवळपास ३०० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात होते.

शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन

नेत्यांना नोटिसा, तरीही आंदोलन ठाम

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलन रोखण्यासाठी राजू शेट्टी, ऋतुराज पाटील यांना नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र आंदोलन ठरल्याप्रमाणे पार पडले.

भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

कृषी दिनाचाच निवड

१ जुलै हा ‘कृषी दिन’ असून, त्या दिवशीच शेतकऱ्यांना आपल्या जमिनी वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली.

Meta Title : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन | कोल्हापूर

Local ad 1