व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सत्तार शेख

मुंबई : व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जामखेड येथील धडाडीचे पत्रकार सत्तार शेख  (Journalist Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department) यांच्या निवड करण्यात आली. एका धडाडीच्या कार्यकर्त्याला संधी देण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. संघटनेच्या डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड (State President of Digital Department Jaipal Gaikwad) आणि सरचिटणीस के अभिजीत (General Secretary K Abhijit) यांनी सत्तार शेख (Sattar Sheikh)  यांना नियुक्ती पत्र नुकतेच प्रदान केले आहे. (Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department)

 

पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कार्यरत असलेल्या ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेचा देशव्यापी कार्यविस्तार आहे. देशातील 23 राज्यात संघटनेचे काम सुरु आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे (Sandip Kale) यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली देशातील पत्रकारांची एकजूट मोठ्या वेगाने होत आहे. 18 हजार पत्रकार संघटनेचे सभासद आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करणारी ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही संघटना पत्रकार आणि पत्रकारितेचा लढा उभारत आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संघटनेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. पत्रकारितेतील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल, साप्ताहिक या विभागाच्या स्वतंत्र विंगद्वारे संघटना बांधणीचे काम देशभरात मोठ्या जोमाने आणि वेगाने सुरु आहे.

 

 

व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजीटल विभागाचे काम महाराष्ट्रात मोठ्या वेगाने सुरु झाले आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात संघटन बांधणी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी जामखेड येथील धडाडीचे पत्रकार सत्तार शेख यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड केली. व्हाईस ऑफ मीडिया डिजीटल विभागाचे नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्तार शेख हे गेल्या 15 वर्षांपासून ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत आहे. आजवर त्यांनी विविध दैनिकांमध्ये काम केले आहे. सध्या ते जामखेड टाइम्स या न्यूज पोर्टल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिजीटल पत्रकारितेत सक्रीय आहेत. शेख यांचा राज्यभरात दांडगा जनसंपर्क आहे. त्याचा मोठा फायदा संघटनेला होणार आहे.
‘व्हाईस ऑफ मीडिया’ अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी (डिजीटल विभाग) सत्तार शेख यांची निवड झाल्याबद्दल संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने, डिजीटल विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड,  डिजीटल विभागाचे सरचिटणीस के अभिजीत, नाशिक विभागीय अध्यक्ष नरेश हळनोर, सह आदींनी अभिनंदन केले आहे. (Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department)

डिजीटल मीडिया काम करणाऱ्या पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया आग्रही आहे. अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या ताकदीने संघटन बांधणी केली जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जे पत्रकार डिजीटल माध्यमांत सक्रीय आहेत, त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्ही काम करत राहू. लवकरच जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका निहाय कार्यकारणी जाहीर केली जाईल,अशी माहिती नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हाध्यक्ष सत्तार शेख यांनी दिली. (Sattar Shaikh as Ahmadnagar District President of Vice of Media Digital Department)
Local ad 1