...

(Ransom case against BJP leader Lodha and his son) भाजप नेते लोढा यांच्यासह मुलावर खंडणीचा गुन्हा

पुणे : भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष तथा प्रसिध्द बांधकाम व्यावसायीक मंगलप्रभात लोढा, आणि त्यांचा मुलासह चौघांवर खंडणी, अपहार, कट रचून फसवणूक केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 54 वर्षीय महिलेनी पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Ransom case against BJP leader Lodha and his son)

मंगलप्रभात लोढा, अभिषेक लोढा (रा. अपोलो मिल कंपाउंड, महालक्ष्मी, मुंबई) तसेच ज्वाला रियल इस्टेट प्रायव्हेट लि. व मायक्रोटेक डेव्हलपर्स लि. यांच्याद्वारे सुरेंद्रन नायर यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान न्यायालयात दाखल झालेल्या 156 (3) च्या याचिकेवरील आदेशवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2013 ते 10 मार्च 2021 या कालवधीत 101 चित्रकुट, गोखले रोड, चतुःश्रृंगी परिसरात घडली. (Ransom case against BJP leader Lodha and his son)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना मुंबईत एक सदनिका खरेदी करायची होती. त्यावेळी त्यांना लोढाच्या स्कीम बाबत माहिती मिळाली. यातील संशयीत आरोपी सुरेंद्रन नायर, मंगलप्रभात लोढा व अभिषेक लोढा यांना तक्रारदाराने अ‍ॅग्रीमेंट टू सेल प्रमाणे सदनिकेची रक्कम 5 कोटी 59 लाख रूपये ठरवली होती. त्यापैकी 3 कोटी 92 लाख एवढी रक्कम तक्रारदारने दिली. परंतु, आरोपींनी ठरल्याप्रमाणे स्कीमचे बांधकाम पुर्ण केले नाही. तसेच फिर्यादीला आजपर्यंत 3 हजार 901 विंग ए लोढा पार्क वरळी मुंबई येथील सदनिकेचा ताबा दिला नाही. (Ransom case against BJP leader Lodha and his son)

mangal prabhat odha

दरम्यान, तक्रारदार यांनी सदनिकेचा पाठपुरावा केला असता संशयीत आरोपींनी केवळ आश्वासने देत स्वतःचा फायदा करून घेतला. त्यांनी तक्रारदारांकडून मोठी रक्कम प्राप्त प्राप्त करून विश्वासापोटी फसवणूकीच्या उद्देशाने अपहार केला. त्यानंतर तक्रारदाराकडे वाढीव रक्कम 4 कोटी 15 लाख रूपये भरा असे सांगून रकमेची मागणी केली. जर तुम्ही रक्कम दिली नाही तर केलेले अ‍ॅग्रीमेंट रद्द करण्यात येईल, तसेच भरलेली सर्व रक्कम जप्त होईल अशी धमकी दिली. तक्रारदारांना 4 कोटी 15 लाखांची रक्कम भरण्यास बळजबरी केली. तसेच मुंबई येथील सदनिका हडप केली आहे, असा आरोप केला आहे. (Ransom case against BJP leader Lodha and his son)

Local ad 1