...

Pune zilla parishad nivadnuk 2025। पुणे जिल्ह्यात नवीन गट-गणरचना जाहीर : ७३ गट, १४६ गण निश्चित

राजकीय पक्ष लागले तयारीला

पुणे. राज्य सरकारने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गट व गणरचनेचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. यानुसार पुणे जिल्ह्यात आता एकूण ७३ गट आणि १४६ गण निश्चित करण्यात आले आहेत. या नवीन गणरचनेनुसार काही तालुक्यांमध्ये गट-गणांची वाढ झाली असून हवेली तालुक्यातील गटांची संख्या १३ वरून १६ करण्यात आली आहे. (pune zilla parishad nivadnuk 2025 gat gan rachan)

याआधी २०२१ मध्ये प्रभाग रचना केली गेली होती, त्यानुसार एकूण लोकसंख्या ९८ लाख होती. मात्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर काही गावे महापालिकेत समाविष्ट झाली. परिणामी २०२५ साठी नव्याने गट व गणांची रचना करण्यात आली आहे. (pune zilla parishad nivadnuk 2025 gat gan rachan)

गट आणि गणरचनेचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे 

  • गटरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख: १४ जुलै २०२५

  • हरकती व सूचना सादर करण्याची अंतिम तारीख: २१ जुलै २०२५

  • विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख: २८ जुलै २०२५

  • विभागीय आयुक्तांकडून अंतिम निर्णय: ११ ऑगस्ट २०२५

  • राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम अधिसूचना सादर करणे: १८ ऑगस्ट २०२५

महाराष्ट्रात जिल्हा परिषद गट कुठे सर्वाधिक, कुठे कमी? तुमच्या जिल्ह्यात किती जाणून घ्या !

तालुकानिहाय गट व गणांची संख्या

तालुका गट गण
जुन्नर १६
आंबेगाव १०
शिरूर १४
खेड १६
मावळ १०
मुलशी
हवेली १६ १६
पुणे
पुरंदर
वेल्हे
बारामती
इंदापूर
दौंड

👉 एकूण — ७३ गट व १४६ गण

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठीचे नियोजन अधिक स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज होऊ लागले आहेत. (pune zilla parishad nivadnuk 2025 gat gan rachan)


Local ad 1