फुलबाजार परवाना घोटाळा !। संचालक मंडळाच्या नातेवाईकांना नियमबाह्य परवाने ?
संचालक मंडळाने नातेवाईकांना दिल्याचा आरोप
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुलबाजारातील परवाना वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळ्याचा उघडकीस आलेला आरोप वाढत आहे. पणनमंत्र्यांनी दिलेल्या चौकशी आदेशांना दुर्लक्ष करत संचालक मंडळाने आपल्या नातेवाईकांना आणि कार्यकर्त्यांना तब्बल ४१ नवीन परवाने दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याशिवाय १५ जणांना परवाने दिले दिल्याचे सांगण्यात येत आहे. (pune krushi utpadan bazar fulbajar parvana ghotala)
महिला साक्षरतेतील चिंताजनक दरी: PLFS अहवाल देशातील वास्तव समोर
फुलबाजारातील २० ते २५ वर्षे प्रतीक्षेत असलेल्या गरिब शेतकऱ्यांना बाजूला ठेवून, काही संचालकांच्या नातेवाईकांना अनियमित पद्धतीने परवाने देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या पूर्वी कधीही फुलांचा व्यापार केला नाही, अशांना परवाने दिले आहेत. २०१९ नंतर नवीन परवाने देण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती, पण २० नोव्हेंबर २०२३ पासून ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ लोकांना दहा हजार रुपयांची अनामत रक्कम भरून परवाने देण्यात आले आहेत, ज्यात अनेक संचालकांचे नातेवाईकही आहेत.
सरकारी नोंदींनुसार, परवाना देण्यासाठी अधिकृत भरणा २ लाख रुपये असला तरी, बाजार समितीतील काही कर्मचारी लाखो रुपये अनधिकृतरित्या घेत असल्याचा संशय आहे. गेल्या काही महिन्यांपासून समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी परवान्यांची यादी मागितली असली तरी ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे यादी लपविण्याचा संशय वाढला आहे. (pune krushi utpadan bazar fulbajar parvana ghotala)
राष्ट्रवादीच्या दोन गटांचा पुण्यात शक्तिप्रदर्शन ; कार्यकर्त्यांचे लक्ष एकवटले !
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर, यांनी “पूर्वीचे परवाना धारक तसेच प्रशासक आणि संचालक मंडळाच्या काळात नव्याने परवाने देण्यात आले आहेत, असा दावा केला आहे. या प्रकरणामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील काही संचालक मंडळ आणि सचिवांना मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.