...

दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी योग्य आहार गरजेचा – डॉ.राजन संचेती

पुणे : दंत्त आरोग्य सांभाळण्यासाठी त्याची योग्य निगा राखण्याबरोबरच,फ़ास्ट फूड टाळणे आणि योग्य आहार असणे आता काळाची गरज झाली आहे असे मत इंडियन मेडिकल आसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजन संचेती यांनी व्यक्त केले. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या दंत आरोग्यासाठी महत्त्वाचे असणाऱ्या पाहिल्याच मौखिक प्रदर्शनाचे आज बालगंधर्व च्या कलादालनात उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रदर्शनाचे आयोजन इंडियन डेंटल असोसिशन पुणे च्या वतीने करण्यात आले होते. (Proper diet is essential to maintain dental health – Dr. Rajan Sancheti)

           आपण पुष्पप्रदर्शन पाहिले ,किल्ले प्रदर्शन पाहिले पण पुण्यातील बालगंधर्व मध्ये अनोखे असे आज दातांच्या समस्येवर  प्रकाश टाकणारे मौखिक प्रदर्शन इंडियन डेंटल असोसिएशन पुणे च्या वतीने आयोजित करण्यात आले होते .या प्रदर्शनास शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता .दातांच्या विविध समस्यांचे चित्ररूपात व प्रात्यक्षिकातून दाखविण्यात आले होते व त्यावर उपाय व मार्ग दाखवण्यात आले होते.या प्रदर्शनास पुणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
           पुणेकर नागरिकांचे दंत आरोग्य सांभाळण्यासाठी येत्या वर्षभरात दंत आरोग्यावर विविध कार्यक्रम व प्रदर्शन पुण्यात राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी इंडियन डेंटल असोसिएशन च्या पुणे अध्यक्षा डॉ.भक्ती दातार यांनी दिले.या वेळी इंडियन डेंटल असोसिएशन पुणे च्या सचिव डॉ.मंजिरी जोशी यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती व उपक्रम यावेळी सांगितले.
       यावेळी डॉ. राजन संचेती,अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन पुणे डॉ. सुमती संचेती, डॉ नितीन बर्वे – माजी अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य,डॉ.भक्ती दातार, अध्यक्ष इंडियन डेंटल असोसिएशन पुण, डॉ.मंजिरी जोशी, सचिव,इंडियन डेंटल असोसिएशन पुणे, डॉ. सुप्रिया गणेशवाडे, डॉ.प्रदीप मालेगावकर , डॉ.विजय फडके यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मौखिक प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
Local ad 1