...

PMC ने झाडण निविदा रद्द केली; सुधारित अटींसह नवीन आराखडा

ही निविदा सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याला मिळावी यासाठी होती प्रयत्न

पुणे, ६ जून २०२५ – पुणे महापालिकेने (PMC) शहरातील रस्ते व मोकळ्या जागांवरील झाडण आणि साफसफाईसाठी प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्थापत्य विभागाच्या आदेशानुसार, निविदा प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज असल्याने ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

 

महिला आरोग्य अधिकाऱ्यांशी गैरवर्तन भाजप नेत्याला भोवले ; पुणे महापालिकेत प्रवेश बंदी !

 

महापालिकेने स्पष्ट केले आहे की स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने काम अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने व्हावे यासाठी नवीन निविदा निकष निश्चित केले जाणार आहेत. त्यामुळे लवकरच नवे आराखडे आणि सुधारित निविदा प्रक्रिया जाहीर केली जाणार आहे. (pmc sweeping tender cancelled 2025)

 

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही निविदा सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याला मिळावी म्हणून दबाव आणला जात होता. या पार्श्वभूमीवर माध्यमांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केल्याने आणि नागरिकांमध्ये नाराजी वाढल्याने महापालिका प्रशासनाला ही प्रक्रिया रद्द करावी लागली. हा निर्णय आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे. शहरातील सामाजिक संस्था, बांधकाम व्यावसायिक आणि नागरिक नवीन निकषांवरील निविदा प्रक्रियेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (pmc sweeping tender cancelled 2025)

 

 

Local ad 1