पीएमसीने दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला बजावली नोटीस ; 48 तासांत 22 कोटी भरा अन्यथा जप्तीचा कारवाई
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन (Lata Mangeshkar Medical Foundation) मार्फत संचालीत दिनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिलेला उपचार नाकरण्याच्या कारणाने चर्चेत आहे. सर्वच क्षेत्रातून टिका होत आहे. दरम्यान, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे मिळकतकराचे २२ कोटी रूपये थकित आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने या रूग्णालयाला जप्तीची नोटीस पाठविली आहेत. त्यात मिळकत कराचे २२ काेटी रुपये दाेन दिवसांत जमा करावी अन्यथा पुढील कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाने नोटीशीदारे दिला आहे. (PMC serves notice to Deenanath Mangeshkar Hospital )
दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात (deenanath mangeshkar hospital) उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दिनानाथ मंगेशकर रूग्णालयाकडे २७ कोटीचा मिळकत कर थकविला आहे. महापालिकेने मिळकत कर वसुल न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (NCP Sharad Chandra Pawar party leader MP Supriya Sule) आणि युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील (Youth Congress State General Secretary Rohan Suravase Patil) यांनी दिला हाेता. त्यामुळे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाला आता महापालिकेने दणका दिला आहे. गेल्या आठ वर्षापासून महापालिकेचा २७ कोटी ३८ लाख ६२ हजार ८७४ रुपयांचा मिळकतकर थकविल्याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास नोटीस देण्यात आहे.
एरंडवणा येथील सदर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनच्या मालकीचे आहे. या मिळकतीवर २०२४ – २५ या आर्थिक वर्षाअखेर सुमारे २७ काेटी ३८ लाख ६२ हजार ८७४ इतका मिळकत कर थकबाकी आहे. या मिळकतीवर आकारण्यात आलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाऊंडेशनने २०१६-१७ साली महापालिकेविरुद्ध न्यायालयात दाद मागितली हाेती. सदर दाव्यात फाऊंडेशनने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या पन्नास टक्के रक्कम आणि इतर कर भरण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार २०१४ ते २०२५ अखेर फाउंडेशनकडे एकुण २२ काेटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये इतकी मिळकत कराची थकबाकी आहे.
मिळकत कराची थकबाकी वसुल करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाची बैठक पार पडली. या बैठकीत सदर मिळकतीवर जप्तीची कारवाई करावी असे ताेंडी आदेश देण्यात आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनला नाेटीस बजावली आहे.