...

पावसाळापूर्व तयारीचा आढावा ; ८ जूनपर्यंत नालेसफाई पूर्ण करा – आयुक्त नवल किशोर राम

लेबर कॅम्प्सच्या सुरक्षिततेवर भर -  labor camp safety

पुणे Pune news 2025  : शहरात पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना, नाले आणि गटारे स्वच्छतेची कामे ८ जूनपर्यंत पूर्ण करा, (PMC drain cleaning deadline) असे स्पष्ट आदेश पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत त्यांनी विविध उपाययोजनांबाबत महत्त्वाचे निर्देश दिले. (PMC Commissioner Orders Completion of Drain Cleaning by June 8) या बैठकीस अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., ओमप्रकाश दिवटे आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील लोकप्रतिनिधींनाही बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते.

 

बोगस लाडक्या बहिणींना सरसकट पैसे वाटप ही चूक तर मान्य, पण प्रशासन व मंत्र्यांवर कारवाई का नाही?

 

 

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहरात पावसाचे पाणी साचणारी २३० ठिकाणे आहेत. यापैकी ११७ ठिकाणी कामे पूर्ण झाली (stormwater drains) असून, उर्वरित ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. जिथे तातडीने काम करणे शक्य नाही, तिथे जलपंप ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टीच्या वेळी त्वरित प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. पथ, विद्युत, उद्यान आणि बांधकाम विभागांचे कर्मचारी त्याठिकाणी नियुक्त करण्यात आले असून, आवश्यक साधनसामग्रीचीही उपलब्धता करून देण्यात आली आहे. (Pune monsoon preparation)

 

 

लेबर कॅम्प्सच्या सुरक्षिततेवर भर –  labor camp safety

पावसाळ्यात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या लेबर कॅम्प्सच्या सुरक्षिततेविषयी विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या कामगारांना आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

जलसंपदा आणि वनविभागाशी समन्वय

पावसाळ्यात धरणांतून नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाची माहिती महापालिकेला वेळेवर मिळावी यासाठी जलसंपदा विभागाच्या नियंत्रण कक्षात कनिष्ठ अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, झाडांची पाहणी करून संभाव्य धोके टाळण्यासाठी वन विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

 

 

डेंग्यू नियंत्रणासाठी आराखडा

पावसाळ्यात वाढणाऱ्या डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाला तातडीने आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Title :  PMC Commissioner Orders Completion of Drain Cleaning by June 8

Local ad 1