...

महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !  

 ऐतिहासिक ३० लाख कागदपत्रांचे डिजिटलायझेशन

पुणे : पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५० पासूनची सर्व कागदपत्रे, ठराव, प्रस्ताव आणि निर्णय आता AI चॅटबॉटद्वारे सहज उपलब्ध होणार आहेत. यासाठी सुमारे ३० लाखांहून अधिक कागदपत्रे स्कॅन करून डिजिटल स्वरूपात संग्रहित केली जाणार आहेत. महापालिकेच्या नगरसचिव विभागात सध्या सुमारे १२ लाख कागदपत्रे आहेत. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजूर ठरावांच्या प्रती यामध्ये समाविष्ट आहेत. ही सर्व कागदपत्रे शोधता येतील अशा स्वरूपात (searchable format) AI चॅटबॉटमध्ये समाविष्ट होणार आहेत.

 

देशातील पहिली ‘क्रीडा नर्सरी’ पुणे महापालिका सुरू करणार

 

महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये पारदर्शकता यावी आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवता यावे, यासाठी या चॅटबॉटचा उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या रस्त्याचे काम कधी झाले? त्यासाठी किती निधी खर्च झाला? किंवा एका कामाचे दोनदा बील काढले गेले आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे नागरिक, पत्रकार, संशोधक, आणि लोकप्रतिनिधींना चॅटबॉटद्वारे मिळणार आहेत.

 

या उपक्रमातून कर मूल्यांकन, कर वसुली, प्रकल्पांचे ऑडिट आणि जुन्या फाईल्सचा संदर्भ घेणे अधिक सुलभ होणार आहे. महापालिकेच्या कार्यालयीन कामकाजातही याचा उपयोग होईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली आहे. AI चॅटबॉट विकसित करणाऱ्या कंपन्यांशी सध्या प्राथमिक चर्चा सुरु असून, लवकरच अद्ययावत कंपनीला हे काम देण्यात येईल.

 

स्मार्ट आधार पीव्हीसी कार्ड आता EMS स्पीडपोस्टने थेट घरी

 

नागरिकांसाठी हा चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे माहिती अधिकार कायद्यानुसार येणाऱ्या विनंत्यांमध्येही घट होईल आणि महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व लोकाभिमुख बनेल, अशी महापालिकेची अपेक्षा आहे.

 

 

 

Local ad 1