Sassoon Hospital Pune। पंधरा हजारांची पेट स्कॅन चाचणी ससून रुग्णालयात करा सहा हजारात

Sassoon Hospital Puneपुण्यासह राज्यातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या पुण्यातील ससून सर्वोपचार केंद्रात (Sassoon Health Care Centre) आता कर्करोगावरील महागड्या चाचण्या अल्पदरात होत आहेत. त्याची सुरुवात झाली असून, रुग्णांना लाभही होत आहे. काय आहेत, चाचण्या या चाचण्या करण्यासाठी खासगी लॅबमध्ये किती खर्च येत होता, आता ससूनमध्ये किती खर्च येईल. हे जाणून घेऊया. विशेष म्हणजे हि चाचणी राज्यातील कुठल्याही रुग्णाला अल्पदरात पेट स्कॅन चाचणी करता येईल. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)

 

कर्क रोगाचे निदान झाल्यानंतर तो शरीरात किती प्रमाणात पसरला आहे, हे पहाण्यासाठी ‘पेटस्कॅन’  (pet scan test) ही चाचणी करावी लागते. या चाचणीसाठी खासगी लॅबमध्ये  १५ ते २० हजार रुपये मोजावे लागतात. परंतु ससून हाॅस्टिपटलमध्ये  ५ ते ६ हजारांमध्ये १२ प्रकारच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची अद्ययावत तपासणी यंत्रणा हाॅस्पिटलमध्ये बसविण्यात आली आले. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)
 

कर्करोगाचे कारणे

बदललेली जीवनशैली, खानपानाच्या सवयी, व्यसन आणि भाज्यांवर जाणारा कीटकनाशकांचा अतिवापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. आताचा तोंडाचा, फुप्फुस, कृत किडनी अशा विविध अवयवांच्या कर्करोगाचे प्रमाणात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)

 

 
एखादी गाठ आली आणि ती कर्करोगाची आहे का? याची चाचणी बायोप्सी करून कळते मात्र इतर ठिकाणीही पसरलेला आहे का? हे पाहण्यासाठी पेटस्कॅन चाचणी करणे गरजेचे आहे. पुण्यात खासगी रुग्णालयामध्ये या तपासणीचा खर्च १५ हजारांच्या पुढे आहे. त्यामुळे हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नाही. त्यामुळे ससून रुग्णालयात गेल्या वर्षी हे पेटस्कॅन मशीन बसवण्यात आले असून आता ते पूर्ण कार्यक्षमतेने सुरू करण्यात आली आहे.

प्रत्येक तपासणीचे किती दर निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार दर आकारले जातात. मात्र, खासगी लॅब पेक्षा हे दर 50 टक्क्यांच्या आतच आहेत. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख शेफाली पवार असून, इंटरव्हेंशनल रेडिओजिस्ट डॉ. किरण नाईकनवरे सहयोगी प्राध्यापक डॉ. इब्राहिम अन्सारी हे काम पहात आहेत. (PetScan at Sassoon Hospital Pune at low cost)

ससून रुग्णालयात दररोज 25 रुग्णांचे पेट स्कॅन तपासणी होऊ केली जाते. स्पेक्ट स्कॅन द्वारे एमडीपी बोन स्कॅन तपासणीतून हाडांमधील ऑस्टिओपोरोसिस, थायराॅईड व त्यांचे कार्य, टी-थ्री, टिएसएच व त्यांच्या ग्रंथीचा स्त्राव याचे कार्य, फुफ्फुस व मेंदुचे कार्य, मायोकार्डियल फंक्शनमध्ये हृदयाच्या स्नायूंना किती व कसा रक्तपुरवठा याची तपासणी केली जाते.
डॉ. इब्राहिम अन्सारी, रेडिओलाॅजिस्ट व समन्यवक पेट सीटी स्कॅन विभाग, ससून रुग्णालय पुणे.

 

 
ससूनमध्ये पेट स्कॅन बरोबर शरीरातील अवयवांचे काम व्यवस्थित होते का? त्यामध्ये काही दोष आहे का? याची चाचणी केली जाते. यासाठी पेट सीटी स्कॅन (स्पेक्ट स्कैन) यामध्ये 34 प्रकारच्या तपासण्या करण्यासाठी स्वतंत्र मशीन आहे.  (Sassoon Hospital cancer tests at low cost)

 

Local ad 1