Parbhani ACB Trap । परभणी महानगरपालिकेतील कर निरीक्षक शेरखान पठाण साडेचार हजार रुपयांची लाच घेताना अटक
Parbhani ACB Trap। परभणी : स्थावर मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी शासकीय शुल्क आणि टेबलवर देण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच घेतना परभणी महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ क ‘ येथील कर निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. (Parbhani Municipal Corporation Tax Inspector Sherkhan Pathan arrested for taking bribe of 11000 thousand rupees)
पठाण शेरखान नुरखान -Pathan Sher Khan Nurkhan (वय 53 वर्षे, पद- कर निरीक्षक, नेमणूक – प्रभाग समिती ‘ क ‘, परभणी शहर महानगरपालिका, परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार 23 वर्षिय तक्रारदार यांच्या आईने परभणी शहर महानगरपालिका हद्दीत स्थावर मालमत्ता खरेदी केलेली आहे. ती स्थावर मालमत्ता आईच्या नावावर हस्तांतरणाचे काम करून देण्यासाठी शेरखान पठाण याने एकुण अकरा हजार रुपयांची मागणी केली. त्यात 6 हजार 500 रुपये शासकीय शुल्क आणि उर्वरित रक्कम 4 हजार 500 रूपये हे टेबलावर द्यावे लागतात असे सांगून लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली होती.
Related Posts
प्राप्त तक्रारीची शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात शेरखान पठाण यांनी मागणी केलेली फि व लाचेची रक्कम त्यांना देण्यासाठी तक्रारदार हे पंचासह कार्यालय प्रभाग समिती क, परभणी शहर महानगरपालिका येथे गेले. त्या ठिकाणी पठाण यांनी शासकीय फि व लाचेची रक्कम असे एकूण अकरा हजार रुपये पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून स्विकारले. त्यावेळी सापळ्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी पठाणला लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन नवामोंढा, परभणी येथे सुरू असल्याचे सांगितले आहे.
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. सापळ्यात पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर, पोह/मिलिंद हनुमंते, रविंद्र भूमकर, सीमा चाटे , अनिरुद्ध कुलकर्णी पोकॉ/ अतुल कदम, मो.जिब्राईल,शेख मुक्तार, राम घुले व चालक कदम आदींचा सहभाग होता.