palkhi sohala 2025। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल
palkhi sohala 2025 पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवार पुण्यनगरीत दाखल होत असून पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपुर्ण शहर सज्ज झाली आहे. वैष्णवांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनासह विविध सामाजिक संघटना, राजकीय नेतेमंडळींनी तयारी आणि नियोजन केले आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात २६ रस्ते बंद ; ६,५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीवरून तर संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूवरून पंढरपूरच्या दिसेने मार्गस्थ झाला आहे. या दोन्ही पालख्या शुक्रवारी पुणे शहरात दाखल होत आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दोन्ही पालख्याचे दर्शन घेवून वैष्णवांचे स्वागत करणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी असणार आहे. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर दोन्ही पालख्या रविवारी (२२ जुन) रोजी पहाटे पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे.
palkhi sohala 2025 । पुण्यात पालखी आगमनाआधी PMC मध्ये बैठकींचा मारा
दरम्यान, पालखी सोहळ्यासाठी आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी महापालिका प्रशासनासह विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि सर्वसामान्य पुणेकरांनी विविध पातळ्यांवर नियोजन व तयारी केली आहे. पालख्यांच्या मुद्दामांच्या ठिकाणांसह पालखी सोहळा ज्या मार्गाने मुक्कामाच्या ठिकाणी दाखल होणार आहे, त्या पालखी मार्गावर चाैकाचाैकांत स्वागत कक्ष, स्वागत कमानी, पावसापासून वारकऱ्यांचा बचाव करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारून निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. संगमवाडी पुलाजवळील सर्व राडारोडा काढण्यात आला असून, रस्ते स्वच्छ करण्यात आले आहे. सध्या पावसाचा जोर असल्याने रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने विविध पथके तैनात ठेवली आहेत.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील सर्व रस्त्याचे झाडणकाम, क्रॉनिक स्पॉटची स्वच्छता व जमा होणार्या कचर्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले आहे. तसेच दोन हजार पोर्टेबल टॉयलेटची (तात्पुरत्या स्वरूपात बसविण्यात आलेले टॉयलेट) व्यवस्था केली आहे. याशिवाय दिवसातून तीन वेळा स्वच्छतेचे नियोजन केले जाणार आहे.
पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्था
आरोग्य विभागाची तयारी
- फिरत्या दवाखान्यांद्वारे मोफत आरोग्यसेवा
- वैद्यकीय पथक (जुना फिरता दवाखाना) वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, नर्स, नर्सिंग ऑर्डर्ली व प्रथमोपचार
- महापालिकेच्या दवाखाने, प्रसुतिगृह/रुग्णालये येथे मोफत तपासणी व उपचार
- पालखी मार्ग, सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी औषध फवारणी
पथ विभागाची तयारी
- सोलापूर रोड व सासवड रोड येथील रेलिंग्जची साफसफाई.
- पॅचवर्कची कामे आणि पावसाचे पाणी साठणार्या ठिकाणी आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत.
अग्निशमन विभागाची तयारी
- अग्निशमन दला कडील सर्व अधिकारी व सेवकांच्या सर्व प्रकारच्या रजा व साप्ताहिक सुट्ट्या रद्द
- मुक्कामाच्या शाळांची आग प्रतिबंधक दृष्टीने पाहणी
- पालख्यांच्या मार्गावरील झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी उद्यान विभागास आवश्यक ते सहकार्य
- फुलेनगर व वाकडेवाडी या ठिकाणी अग्निशमन वाहन तैनात
-
palkhi sohala 2025 pune warkari welcome arrangement विद्युत विभाग
- तात्पुरत्या मंडपामध्ये प्रकाश व्यवस्था व ध्वनीक्षेपक यंत्रणा व्यवस्था
- वारकर्यांच्या निवास शाळांमध्ये प्रकाश व्यवस्था
- मंदिर परिसरात सी.सी.टीव्ही कॅमेरे
अतिक्रमण विभाग
पालखी मार्ग व मुक्काम परिसरातील रस्ता व पदपथावरील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन पथके, बहुउद्देशीय पथके व सर्व संबंधित अतिक्रमण निरीक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांची नेमणुक.
आपत्ती व्यवस्थापन विभाग
महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापना संदर्भातही नियोजन करण्यात आले असुन आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वीत असेल.
महापालिकेचे आवाहन
- नागरिकांनी, वारकर्यांनी पालखी मार्ग, पालखी निवास परिसर येथे व ज्या ज्या ठिकाणी महापालिकेने पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे, तेथीलच पाण्याचा वापर करावा.
- परिसरातील सार्वजनिक शौचालये, मोबाईल टॉयलेटस, सुलभ शौचालये यांचा वापर करावा.
- उघड्यावरील अन्नपदार्थ ,चिरलेली व अति पिकलेली फळे खाऊ नयेत.
- केळींच्या, फळांच्या साली खाद्यपदार्थाचे कागद असा कचरा निश्चित केलेल्या कचरापेटीत टाकावा अथवा संबंधित कर्मचारी, संबंधित स्वयंसेवकांकडे द्यावा.
- पालखी कालावधी कृपया प्लॅस्टिक बॅगा, कॅरीबॅगांचा वापर करण्यात येऊ नये.