...

palkhi sohala 2025 । पुण्यात पालखी आगमनाआधी PMC मध्ये बैठकींचा मारा

महापालिकेत शुकशुकाट, नागरिकांची गैरसोय

palkhi sohala 2025 । पुणे, दि. १९ जून : पंढरपूरला प्रस्थान ठेवणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवार, २० जून रोजी पुणे शहरात मुक्कामी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर पालखीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू असून, अधिकारी आणि राजकीय प्रतिनिधी वेगवेगळ्या पातळ्यांवर सातत्याने बैठका घेत आहेत. त्यामुळे महापालिकेतील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

 

बिग ब्रेकिंग ; जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार, पाच गंभीर जखमी

 

गेल्या आठ दिवसांपासून दररोज वारी नियोजनाच्या बैठका होत असून, अनेक विभागप्रमुख सतत बैठकीमध्ये अडकले आहेत. यामुळे कार्यालयात अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आदींसोबत वारीसंदर्भात महत्वाची बैठक झाली. यात वारकऱ्यांसाठी शौचालय, स्वच्छ पाणी, रस्त्यांची डागडुजी यासारख्या सुविधांबाबत निर्देश देण्यात आले.

 

पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली  

 

त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्वतंत्र बैठक घेतली. भाजपचे आमदार हेमंत रासने यांनीही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून वारी नियोजनाच्या विविध बैठका होऊ लागल्यामुळे महापालिका अधिकारी सतत गैरहजर राहत आहेत. बुधवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अध्यक्षता केली. अडीच तास चाललेल्या या बैठकीत विविध विभागप्रमुख हजर होते, परिणामी अनेक नागरिकांचे काम लांबले.

 

पुण्यातील दोन्ही पालख्या शुक्रवारपासून मुक्कामी येणार असल्याने, वारीदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आणि पोलिसांनी अंतिम टप्प्यातील तयारी पूर्ण केली आहे.

Local ad 1