ATM वापारताय नवे नियम लागू ; जाणून घ्या..
MH टाईम्स वृत्तसेवा : बँकेच्या (The bank) रांगेत न थांबता (Atomatic teller machine ATM) मधून पैसे (Money) काढण्याची सवय झाली आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होत आहे. मात्र, ATM मधून पैसे काढणे आता महाग झाले आहे. नवीन वर्षात (New Year) ATM वापवऱ्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम रिझर्व बँकेने (Reserve Bank of India RBI) केले असून, नेमके काय नियम आहेत. जाणून घेऊयात… (New rules apply when using ATMs; Find out ..)
राज्याची डोकेदुखी वाढली ; शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट, किती रुग्ण वाढले ?
रिझर्व बँकेच्या नव्या नियमांनुसार आता ATM मधून विनाशुल्क पैसे काढण्यावर मर्यादा आल्या आहेत. ग्राहकांनी जर आता ATM व्यवहाराची मर्यादा ओलांडली तर त्यांना १ जानेवारी २०२२ पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India RBI) प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (New rules apply when using ATMs; Find out ..)
New restrictions। नांदेड जिल्ह्यात लग्नात आता फक्त 50 लोकांनाच परवानगी
जून २०२१ च्या आदेशाप्रमाणे, १ जानेवारी २०२२ पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना ATM व्यवहारांवर प्रति व्यवहार २१ रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही (GST)भरावा लागणार आहे. या नव्या नियमांमुळे ATM मधून पैसे काढणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणे आता महागले आहे. (New rules apply when using ATMs; Find out ..)
Omicron update | ओमिक्रॉनचा मोठा विस्फोट : राज्यात पाच हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले
असे आहेत नियम….
ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येणार आहेत. पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा विनामूल्य व्यवहार करू शकता. इतर एटीएमधून तीनपेक्षा जास्त वेळ पैसे काढले तर त्यांनी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. (New rules apply when using ATMs; Find out ..)
आता मोजावे लागतील 21 रुपये..
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार “बँकांना उच्च विनिमय शुल्काची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सामान्य वाढ लक्षात घेता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये करण्याची परवानगी आहे. यासंदर्भातील माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे. एसएमएसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर केलेल्या व्यवहारावर २१ रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार आहे.
कितीवेळा काढता येतील विनाशुल्क पैसे..
मेट्रो शहरात राहणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद (Bangalore, Mumbai, Chennai, Delhi, Kolkata and Hyderabad) शहरातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आणि अॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून तीन वेळा निशुल्क पैसे काढता येणार आहेत. (HDFC Bank customers and Axis Bank customers will be able to withdraw money from ATMs three times free of cost.)