...

नवल किशोर राम यांची पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी नवलकिशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Pune Municipal Commissioner Dr. Rajendra Bhosale) हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, रिक्त होणाऱ्या या पदासाठी सामान्य प्रशासन विभागाने राम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. (Naval Kishore Ram appointed as Pune Municipal Corporation Commissioner)

 

या संदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव (सेवा) राजेश कुमार (Additional Chief Secretary (Services) Rajesh Kumar) यांनी जारी केले आहेत. ३१ मे रोजी डॉ. भोसले यांच्याकडून नवलकिशोर राम आयुक्त पदाचा अधिकृत पदभार स्वीकारणार आहेत.

 

महापालिकेच्या आयुक्तपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना, नवलकिशोर राम यांचे नाव आघाडीवर असल्याचे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात बोलले जात होते. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत, अपेक्षेप्रमाणे राम यांची नियुक्ती पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Local ad 1