Nashik ACB Trap । चार हजार रुपयांची लाच स्विकारणारा पोलिस शिपाई अटक

 Nashik ACB Trap । नाशिक : दारू बंदी कायद्यान्वये दाखल (Filed under Liquor Prohibition Act) गुन्ह्यात मदत करण्यासाठी मालेगाव तालुका पोलिस ठाण्यातील (Malegaon Taluka Police Station) पोलिस शिपाई (police constable) याने तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपयांची मागणी केली. ती लाच पोलिस ठाण्याच्या वाहनतळात स्विकारताना एसीबीच्या पथकाने पोलिस शिपायाला अटक केली. या घटनेने नाशिक पोलिस दलात (Nashik Police Force) एकच खळबळ उडाली आहे.

 

करण गंभीर थोरात (Karan Gambhir Thorat) असे अटक केलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. तो सध्या मालेगाव पोलिस स्टेशन, नाशिक ग्रामीण (Malegaon Police Station Nashik Rural) येथे कार्यरत आहे.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या बहिणीविरोधात मालेगाव पोलिस स्टेशन, नाशिक ग्रामीण येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या तपासात मदत करण्यासाठी थेरात याने तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपयांची मागणी केली. परंतु तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे केली.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme । पिक विमा भरपाईपासून अडिच हजार शेतकरी वंचित ! 

 

एसीबीने केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यात थोरात याला 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिकच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरिक्षक साधना भोये-बेलगावकर यांच्या पथकाने केली.

Local ad 1