...

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड, नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहेत्यावर नांदेड पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने अवैध रेती उपसावर संयुक्त धाड टाकून मोठी कारवाई केली. या मोहिमेत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार

 

ही कारवाई उस्माननगर, कुंटूर व मुदखेड पोलिस ठाणे तसेच महसूल पथकाच्या संयुक्त मोहिमेत पार पडली. यात चार मोठ्या बोटी (किंमत अंदाजे 60 लाख रुपये) व चार छोटे इंजिन बोटी (किंमत अंदाजे 40 लाख रुपये) असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

UIDAI चा नवा नियम : आधारमध्ये जन्मतारीख बदलण्यावर मर्यादा ; कितीवेळा बदल करता येईल जाणून घ्या..

 

जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाणे उस्माननगर येथे जमा करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ ही नांदेड पोलिसांची विशेष मोहीम आहे. या अंतर्गत अवैध कृत्यांमध्ये गुंतलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली जाते, तसेच गुन्हेगारीसाठी वापरला जाणारा मुद्देमाल, शस्त्रसाठा आणि इतर अवैध साधनांवर कारवाई केली जाते. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अल्पावधीतच अनेक प्रकरणे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.

Local ad 1