राजकीय पटलावर दिवसभर घडलेल्या घटनांचा आढावा जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra political crisis live updates : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दिवसभर दोन्ही गटांकडून राजकीय घडामोडी घडत आहेत. आज दिवसभर  काय घडलं हे जाणून घेऊया.. (Get an overview of the day’s events on the political scene with a single click)

 

 

  • राज्यातील सुरू असलेल्या पेचप्रसंगावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली. (Get an overview of the day’s events on the political scene with a single click)

 

 

  • एकनाथ शिंदेंच्या सोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर दबाव निर्माण करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरावे, रस्त्यावरची लढाई सुरू करावी असे बैठकीत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.  (Get an overview of the day’s events on the political scene with a single click)

 

  • दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर आता दोन अपक्षांनी हे पत्र लिहिले असून, त्यांनी या पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यांचा संदर्भ दिला आहे.
  • महाराष्ट्र पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे विशेष आदेश दिले आहेत. (Get an overview of the day’s events on the political scene with a single click)

 

  • आपण ज्यांना मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, आता ती आपण पुरी करु शकत नाही असे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार केलं, मग माझ्या मुलाने काहीच करु नये का असा सवालही त्यांनी केला.
    • मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकांऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले की, आपण यांना सर्व काही दिले. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं असते, पण पैशाचा विषय नको म्हणून ते खाते एकनाथ शिंदे यांना दिले.

 

  • आधी यांच्यासाठी बाळासाहेब विठ्ठल होते, आणि आम्ही बडवे होतो. आता मी विठ्ठल आहे आणि आदित्य बडवा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, या सर्वामागे भाजपचा हात आहे. आतापर्यंत जे लोक भाजपसोबत गेले, ते सर्वजण संपले आहेत.
Local ad 1