...

राज्यात अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती बाधित | नांदेडमध्ये सर्वाधिक नुकसान

पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना तातडीने मदत – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाल्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागातील पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात असून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही,” असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 

 

अतिवृष्टीमुळे राज्यातील २९ जिल्ह्यांतील १९१ तालुके बाधित झाले आहेत. या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरात १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (सुमारे ३६ लाख एकर) बाधित झाले असून त्यापैकी १२ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. १५ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.

 

 

गणेश विसर्जन 2025 : पुणे महापालिकेची तयारी पूर्ण, २ हजार कर्मचारी व हौद व्यवस्था

 

सर्वाधिक बाधित जिल्हे (हानी – हेक्टरमध्ये)

  • नांदेड – ६,२०,५६६
  • यवतमाळ – १,६४,९३२
  • वाशीम – १,६४,५५७
  • धाराशिव – १,५०,७५३
  • बुलढाणा – ८९,७८२
  • सोलापूर – ४७,२६६
  • अकोला – ४३,८२८
  • हिंगोली – ४०,०००

 

Local ad 1