वृक्षारोपन करुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन (Lokshahir Annabhau Sathe)

नायगांव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडगा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिरात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्पगुच्छ अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. (Lokshahir Annabhau Sathe)
समाजातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प नाथोबा विद्यालयाचे प्राध्यापक ब.ना.गोईनवाड यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबरीने गावच्या सरपंच लक्ष्मीबाई देवीदास पाटील पवळे यांनी देखील आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले. (Lokshahir Annabhau Sathe)

यावेळी विलास पाटील गडगेकर, अशोक कोरे, पत्रकार वसंत पा.जाधव, शिवाजीराव माळगे, राजकुमार गुरूनाथराव पाटील, मिरा पटेल शेख, उमाकांत लघुळे, विठ्ठल भांगे, गजानन रानडे, शिवाजी गोईनवाड, राजेश गोईनवाड, केशव भांगे, राम भांगे, रंजीत गोईनवाड, दिगंबर गोईनवाड आदींची उपस्थिती होती. (Lokshahir Annabhau Sathe)

Local ad 1