‘LGBTQIA+’ community । ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाने रॅली काढून मांडली व्यथा : कुठे व का काढली रॅली ?

LGBTQIA+‘ community । पुणे :लोकशाही प्रक्रीया अर्थपूर्ण होण्यासाठी समाजाने ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदायाच्या समस्या जाणून घेत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे गरजचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकांत देशपांडे यांनी केले. (Society should stand behind ‘LGBTQIA+’ community : Chief Electoral Officer Dr. Shrikant Deshpande)

 

Monsoon weather forecast। जून ते सप्टेंबर कालावधीत पाऊस कसा असेल? ; मॉन्सूनच्या आशेवर धुळवाफेची पेरणी करावी का? (व्हिडीओ)

 

पुण्यातील ‘युतक’ या संस्थेतर्फे आयोजित ‘एलजीबीटीक्यूआयए+’  समुदायाच्या अभिमान पदयात्रेत सहभाग घेऊन डॉ.देशपांडे यांनी उपस्थितांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रभारी.निवडणूक उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के आणि ‘एलजीबीटीक्यूआयए+’ समुदाय तसेच युतक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

डॉ.देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रीयेत प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. ‘एलजीबीटीक्यूआयए+’  समुदायाचे सदस्य पदयात्रेत सहभागी होऊन आपल्या समस्या समाजासमोर मांडत असतांना समाजाकडूनही त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. त्यांचे शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नाकडेही समाजाने लक्ष देणे गरजेचे आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रीयेत समाजातील प्रत्येक घटकाने सहभागी होणे गरजचे आहे, असे त्यांनी सांगितले.

 

संभाजीराजे उद्यान – डेक्कन बस स्थानक, गूड लक चौक – एफसी गेट – शिरोळे रोड – संभाजीराजे उद्यान या मार्गावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने मतदार नोंदणीचेदेखील आवाहन करण्यात आले. रॅलीच्या निमित्ताने ‘एलजीबीटीक्यूआयए+’  समुदायाच्या सदस्यांनी आपल्या समस्या समाजासमोर मांडल्या आहेत. (Society should stand behind ‘LGBTQIA+’ community : Chief Electoral Officer Dr. Shrikant Deshpande)
Local ad 1