2025 विधानसभा : ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे महायुतीला बहुमत – अजित पवार
लोकसभा पराभवातून घेतले धडे, योजना केंद्रस्थानी ठेवत महायुतीला मिळवून दिला विश्वास – बालेवाडीत वर्धापन दिन कार्यक्रमात अजित पवारांचे भाष्य"
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालेवाडीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहिण‘ या योजनेचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयात मोलाचा वाटा असल्याचे स्पष्ट केले. (ladki bahin yojana ajit pawar kabuli)
महानगरपालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभाग अनिवार्य – शासनाचा मोठा निर्णय
पवार म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत केवळ चार जागा मिळाल्या, तेव्हा जनतेत नाराजी होती. त्या अपयशानंतर आम्ही आत्मपरीक्षण केले. त्यातून ‘लाडकी बहिण योजना सुरु करावी असा विचार पुढे आला. या योजनेसाठी ४० ते ४५ हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली. दर महिन्याला लाभार्थींना निधी मिळावा हे पाहणे ही जबाबदारी आमच्या सहकारी आदिती तटकरे यांच्यावर सोपवली होती. या योजनेवर भर दिला आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.” (राष्ट्रवादी काँग्रेस)
महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्यांना ‘मोक्का’खाली कारवाई !
“भाजपसोबत का गेलो?” – अजित दादांचे स्पष्ट उत्तर
भारतीय जनता पेक्षा सोबत जाण्याच्या निर्णयावर उठणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, “लोक विचारतात की आम्ही भाजपसोबत का गेलो. २०१९ मध्ये आम्ही शिवसेना पक्षासोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी काही मुद्द्यांवर तडजोडही झाली होती. पण केवळ आंदोलनं आणि मोर्चे काढून विकास होत नाही. सरकारमध्ये राहून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचवणे हेच महायुतीमध्ये सामील होण्यामागचं उद्दिष्ट होते.” ते पुढे म्हणाले, “आम्ही कधीच आमच्या विचारसरणीशी तडजोड करणार नाही. ज्या दिवशी तडजोड केली जाईल, त्या दिवशी आमची नींव कमकुवत होईल. ही लढाई विचारांची आहे आणि आम्ही ती विचारांवरच लढणार आहोत.”
बातमीचा सोर्स – शासनाने जारी केलेला आदेश