मोठी बातमी : आरोग्य विभागातील परीक्षा पुढे ढकलल्या

Pune News पुणे : आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, आशी माहिती आरोग्य विभागाने वेबसाईटवर दिली आहे. (Health department exams postponed)

 

 

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गट क आणि ड संवर्गातील पदांसाठी उद्या आणि परवा लेखी परीक्षा होणार होती. परंतु, अनेक उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे हॉल तिकीट प्राप्त झाले नाहीत, तसेच परीक्षा केंद्र चुकीचे आले आहेत, त्यामुळे उमेदवारांची गौरसोय टाळण्यासाठी परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. (Health department exams postponed)

 

विद्यार्थ्यांना त्यानुसार आरोग्य विभागाकडून एसएमएस, इमेल द्वारे काळविण्यात आले आहे. पुढील तारीख लवकरच कळविण्यात येणार. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना काही तास आधी परीक्षा रद्द झाल्याने मनस्ताप सहनकारवा लागला आहे. (Health department exams postponed)

Local ad 1