Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi
MH Times Dax – नेपाळमधील सत्तापालटामध्ये Gen Z पिढीने महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. तेव्हांपासून Gen Z पिढीचा उल्लेख सोशल मिडियावर होत आहे. Gen Z पिढीसह आतापर्यंत जन्मलेली मुले कोणत्या पिढीतील आहे. Gen Z ही पिढी तंत्रज्ञान (Technology) सहज अवगत करणारी म्हणून ओळखली जाते. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांवर वाढलेली ही तरुणाई समाजकारणातही सक्रिय आहे. मानवजातीच्या इतिहासात प्रत्येक कालखंडानुसार विविध पिढ्यांना वेगवेगळी नावे दिली गेली आहेत. ही विभागणी साधारणपणे जन्मवर्षांवर आधारित असते. तंत्रज्ञान, जीवनशैली, सामाजिक बदल आणि आर्थिक घडामोडींनुसार प्रत्येक पिढीची वैशिष्ट्ये वेगळी ठरतात.
EB-5 Visa India । अमेरिकेच्या व्हिसासाठी ‘ईबी-५’चा पर्याय : कशी मिळते ग्रीन कार्डची संधी
आज Gen Z पिढी समाजकारण, शिक्षण, करिअर आणि डिजिटल क्रांतीत आघाडीवर आहे. त्यानंतरची Gen Alpha पिढी पूर्णपणे तंत्रज्ञान-केंद्रित आहे. येणारी Gen Beta पिढी मात्र मानवी इतिहासातील सर्वात “फ्युचरिस्टिक” (Futuristic) पिढी ठरणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
विविध पिढ्यांचे वर्गीकरण (Generations Classification)
Silent Generation (सायलेंट जनरेशन) – 1928 ते 1945 दरम्यान जन्मलेले.
Baby Boomers (बेबी बूमर्स) – 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेले.
Generation X (जनरेशन एक्स) – 1965 ते 1980 दरम्यान जन्मलेले.
Millennials / Gen Y (मिलेनियल्स) – 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेले.
Generation Z (Gen Z / जनरेशन झेड) – 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेले.
Generation Alpha (Gen Alpha / जनरेशन आल्फा) – 2013 ते 2024 दरम्यान जन्मलेले.
Generation Beta (Gen Beta / जनरेशन बीटा) – 2025 पासून जन्मलेली नवीन पिढी.
Gen Z म्हणजे काय?
जन्मवर्ष (Birth Years) : 1997 ते 2012
वैशिष्ट्ये (Features) : Internet आणि Social Media मध्ये पूर्णपणे वाढलेली पिढी. Technology-savvy (तंत्रज्ञान पटकन आत्मसात करणारी). Startup culture, Freelancing आणि Innovation कडे आकर्षण असणार आहे. Climate change, Social justice यांसारख्या मुद्द्यांवर जागरूक असल्याचे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.
Gen Alpha आणि Gen Beta
Gen Alpha (2013 – 2024) : ही पिढी संपूर्णपणे Smartphones, Tablets आणि AI तंत्रज्ञानासोबत वाढत आहे.
Gen Beta (2025 पासून): ही पुढची पिढी Artificial Intelligence (AI), Robotics, Virtual Reality (VR) आणि पर्यावरणीय बदलांचा थेट अनुभव घेईल.