पोटात बाळ, डोळ्यांत अश्रू ; अखेर तिला मिळाली ‘माहेर’ची सावली
सासरच्या छळाला कंटाळलेल्या गर्भवती महिलेला ‘माहेर’ संस्थेचा आधार
पुणे : पाच महिन्यांची गरोदर असलेली अर्चना (नाव बदललेले) ही वारजे येथील महापालिकेच्या पृथक बराटे दवाखान्यात तपासणीसाठी आली होती. तपासणी पूर्ण झाल्यावर देखील ती तिथून हलण्यास तयार नव्हती, कारण घरात होणाऱ्या छळामुळे तिला तिथून परत जायचं नव्हतं. पती दारू पिऊन मारहाण करत असे, सासूचा त्रास होता आणि आई-वडीलही नव्हते. तिच्या पोटात अजून एक जीव असताना, तिला कोठेही आधार नव्हता.
सासवडमध्ये १ कोटी ३३ लाखांचा मद्यसाठा जप्त; कंटेनर चालक अटकेत
वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली वेताळ यांनी तिच्या परिस्थितीची जाणीव घेत तिला समजावले, मोफत सोनोग्राफी करून दिली आणि ‘माहेर’ संस्थेशी संपर्क केला. ‘माहेर’ ही संस्था निराधार आणि छळग्रस्त महिलांसाठी काम करते. संस्थेने तिला तातडीने आसरा देण्याचे मान्य केले. रुग्णवाहिकेत तांत्रिक अडचण आल्यामुळे स्मिताला दुसऱ्या दिवशी संस्थेत नेण्याचे ठरले, पण त्या रात्री घरी गेल्यावर तिला परत मारहाण झाली आणि घराबाहेर काढण्यात आले. शेवटी ती स्वतः पिशवी घेऊन, नवऱ्याच्या त्रासापासून कायमचा सुटका शोधत बाहेर पडली.
महापालिकेच्या निर्णयांचा इतिहास आता AI चॅटबॉट वर उपलब्ध होणार !
‘माहेर’मध्ये नवीन सुरुवात
पुढील दिवशी तिला ‘माहेर’ संस्थेच्या वढू बुद्रूक येथील केंद्रात सुरक्षितपणे नेण्यात आले. तिथे आशा वर्कर आणि परिचारिका होत्या. संस्थेच्या व्यवस्थापक मिनी एम.जे. यांनी सांगितले की, “आमच्याकडे २६० निराधार महिलांसाठी निवासाची व्यवस्था आहे. स्मिता आणि तिच्यासारख्या आणखी दोन गर्भवती महिलाही आमच्याकडे आहेत. ती येथे कितीही दिवस राहू शकते.” माहेर संस्थेची पुणे शहरात एकूण ३८ केंद्रे असून, शून्य ते ८० वर्षे वयोगटातील निराधार महिला, पुरुष, वयोवृद्ध, मानसिक आजार असलेले रुग्ण, लहान मुले आणि गर्भवती महिला यांना वेगवेगळ्या केंद्रांमध्ये राहण्याची सुविधा आहे.
‘डॉक्टर डे’ चा विशेष अनुभव
डॉ. प्रणाली वेताळ म्हणाल्या, “ती गेली तेव्हा स्टाफच्या गळ्यात पडून रडली. तो दिवस ‘डॉक्टर डे’ होता आणि इतरांना मदत करण्यातून मिळणारे समाधान त्या दिवशी मिळाले. तिच्यासाठी केलेली ही छोटी मदत आमच्यासाठी मोठ्या समाधानाची गोष्ट ठरली.”