गुंठेवारी प्रस्ताव स्विकारण्यास मुदतवाढ, कधीपर्यंत असेल मुदत जाणून घ्या…
नांदेड : गुंठेवारीचे बरेच प्रस्ताव दाखल करावयाचे शिल्लक असल्याने ग्रामीण भागातील गुंठेवारीचे प्रस्ताव दाखल करण्यास गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांच्या हस्ते ग्रामिण भागातील भुखंडाच्या गुंठेवारी प्रमाणपत्रचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. (Extension of time for accepting Gunthewari proposal, find out how long it will be)
Related Posts
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम (नियमाधीन करणे,श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम 2021 अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 31 डिसेंबर 2020 पूर्वीचे अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यास मान्यता दिली. (Extension of time for accepting Gunthewari proposal, find out how long it will be)
नांदेड जिल्हयातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत हद्दीअंतर्गत क्षेत्रवगळून उर्वरित ग्रामीण भागातील 31 डिसेंबर 2020 पूर्वी अस्तित्वात असलेले अनधिकृत भुखंड / अनधिकृत भुखंडावरील बांधकाम नियमाधिन करण्यासाठी नगर रचना विभाग (शाखा कार्यालय नांदेड) यांच्याकडील नोंदणीकृत परवानाधारक आर्किटेक्ट / इंजिनियर यांच्या मार्फत छाननी शुल्कासह प्रस्ताव दाखल करण्यास 30 एप्रिल 2022 पर्यत मुदत देण्यात आली होती. त्यास आता गुरूवार 30 जून 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्राधिकृत अधिकारी (गुंठेवारी कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांनी कळविले आहे. (Extension of time for accepting Gunthewari proposal, find out how long it will be)