Recruitment for 751 posts in Cooperative Department। सहकार विभागातील 721 पदांसाठी होणार भरती

Recruitment for 751 posts in Cooperative Department । सहकार विभागातील 751 पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी लिपिक व टंकलेखकांची मिळून 448 पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) केली जाणार आहे. तर उर्वरित पदे ही टाटा कन्सलटन्सी मार्फत भरली जातील, असे सांगण्यात आले.

 

डॉ. अनिल रामोड यांना 13 जूनपर्यंत कोठडी, किती मिळाली रोख रक्कम ?

 

शासनाच्या 30 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार ज्या विभागाचा आकृतिबंध मंजूर आहे, त्यानुसार रिक्त जागांपैकी शंभर टक्के तर उर्वरित विभागांपैकी 80 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. सहकार विभागातील लिपिक व टंकलेखक पदांची मिळून 366 पदे आणि लेखापरीक्षकांची 82 मिळून एकूण 448 पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाणार आहे.

लिपिक पदासाठी कुठे किती जागा

  • सहकार आयुक्तालय – 26
  • मुंबई- 36
  • कोकण -25
  • पुणे -38
  • कोल्हापूर 30,
  • औरंगाबाद -33
  • नाशिक- 66
  • लातूर- 36
  • अमरावती – 33
  • नागपूर- 43
लेखापरीक्षक
 मंबई 29, पुणे -17, कोल्हापूर-9, औरंगाबाद -19, नाशिकमधील 8 पदांचा समावेश आहे.
सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील 303 पदांच्या भरतीसाठी आयुक्तालयाने टाटा कन्सलटन्सी (Tata Consultancy Services) बरोबर करार केला असून 15 ऑगस्टपूर्वी ही नोकरभरती प्रक्रिया पूर्ण होईल. ऑनलाइन परीक्षा (Online Examination) होणार असून, त्याची प्रक्रिया पूर्ण होताच कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (Recruitment for 751 posts in Cooperative Department)

 गट ‘क’ संवर्गातील पदे

 सहकार आयुक्तालय मुख्यालय 29, पुणे 23, कोल्हापूर 26, अमरावती 36, औरंगाबाद 24, नाशिक 40, कोकण 27, मुंबई 23, लातूर 30, नागपूर 38 पदे भरली जाणार आहेत. (Recruitment for 751 posts in Cooperative Department)
Local ad 1