मुलीला ‘आयटम’ म्हणून हाक मारणे पडले महागात, दीड वर्षासाठी गेला तुरंगात

मुंबई : महिला आणि मुलींचा विनयभंगाच्या घटना घडत आहे. मुंबईत (Mumbai) एका 26 वर्षिय रोडरोमियोने एका मुलीला आयटम (Item) म्हणून हाक मारणे महागात पडले आहे. (Calling the girl as an item cost him dearly, going to jail for a year and a half)

 

 मुंबईत एका शाळकरी मुलीला  (school girl) ‘आयटम’ (Item) बोलवून तिचा विनयभंग केल्याचा आरोप व्यक्तीवर होता. जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल,असे मुंबईतील स्पष्ट करत ‘आयटम’म्हणून हाक मारणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने दीड वर्षाचा कारावास सुनावला आहे.  (Calling the girl as an item cost him dearly, going to jail for a year and a half)

 

 

 जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल,असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (Calling the girl as an item cost him dearly, going to jail for a year and a half)

 

 

काय आहे प्रकरण

मुंबईतील POCSO न्यायालायेन 26 वर्षीय व्यावसायिकाला 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. 2015 मध्ये आरोपीने शाळेतून परतणाऱ्या मुलीचे केस ओढत म्हटले ‘क्या ‘आयटम’ कहाँ जा रही है?’ न्यायालयाने सांगितले की, आरोपी एक महिन्यापासून लैंगिक हेतूने मुलीचा पाठलाग करत होता.

रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक

आरोपीच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका फेटाळून लावताना विशेष न्यायाधीश एसजे अन्सारी म्हणाले, महिलांना अन्यायकारक वागणुकीपासून वाचवण्यासाठी अशा गुन्ह्यांवर कठोरपणे कारवाई करणे आवश्यक आहे. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. एका 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या व्यावसायिकाला पोक्सो कोर्टाने दोषी ठरवले.

Local ad 1