gold medal : बजरंग पुनियाने कुस्तीत कमाले सुवर्ण

Bajrang punia : कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) आज भारताने आणखी एका सुवर्णपदकाला (gold medal) गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang punia) याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. (Bajrang Punia won gold medal in wrestling)

 
 

 

आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलोग्राम फ्रीस्टाइल गटात राऊंड 16 मध्ये नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने मात देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. (Bajrang Punia won gold medal in wrestling)

 

बजरंगने आधी उपांत्यपूर्व फेरीत मॉरीशसच्या कुस्तीपटूला आणि नंतर उपांत्य फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेनुसार इंग्लंडच्या जॉर्ज रॅमला मात देत फायनल गाठली. आता फायनलमध्ये त्याने कॅनडाच्या मॅकनील याला 9-2 ने मात देत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. (Bajrang Punia won gold medal in wrestling)

 

Local ad 1