“काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते!” : जितेंद्र आव्हाड

NCP leader Jitendra Awad : ठाण्यातील मॉलमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो दरम्यान झालेल्या राडा प्रकरणी ठाण्यातील वर्तक पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक केली होती. आज त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने जमीन मंजूर देण्यात आला. त्यानंतर आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. (Bail granted to NCP leader Jitendra Awad)

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासह साथीदारांना पोलिसांनी अटक (Jitendra Ahwad Arrested ) केली होती. आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. (Bail granted to NCP leader Jitendra Awad)

 

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0nWSM38p1CGsRdbLaDCP8vfVREVK59Uz2NkmZGtAjBbA8GrftW5vJaofJpTy8kDMLl&id=100044467058135

 

जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाल्यानंतर आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जामीन मिळाल्यानंतर आव्हाड यांनी फेसबुकसह अन्य सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे, ते म्हणतात ‘काही लोकांना जमिनीवर आणायचं असेल तर जामिनाची पर्वा करायची नसते ! चाणक्य नीती फसली… जामीन जेवण दोन्ही मिळाले.” असा मजकूर असलेले पोस्ट केली आहे. (Bail granted to NCP leader Jitendra Awad)

Local ad 1