Pune camp area । पुणे कॅम्प परिसरात बेवारस बॅग आढळली ; एकच खळबळ !

Pune camp area । पुणे : लष्कर भागातील महात्मा गांधी (M G Road) रस्त्यावरील नाज चौकात (Naaz Chowk) असलेल्या वेलनेस फॉरेव्हर मेडिकलच्या (Wellness Forever Medical) पायऱ्यावर अज्ञात व्यक्तीने एक काळ्या रंगाची बेवारस बाग ठेवल्याचे आढळून आले. यामुळे MG Road परिसरात एकच खळबळ उडाली. काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, हे रंगीत तालीम (Mac drill) आल्याचे लष्कर पोलिसांकडून असल्याचे स्पष्ट करण्यात आले. (Unusual bag found in Pune camp area; A single sensation!)

 

 

शहरातील गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी कृत्य, घातपात होऊ शकतो, यावेळी पोलीस यंत्रणा आणि सामान्य नागरिक किती सतर्क आहेत, हे पाहण्यासाठी रंगीत तालीम घेतली जाते. मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील वेलनेस फॉरेव्हर मेडिकल, (नाज चौक, एमजी रोड, कॅम्प) (Naaz Chowk, MG Road, Camp) पुणे येथे दहशतवाद व घातपात रोखण्याकरिता ऑंटी टेरेरिझम चेकिंग (डमी डेकॉय) वरिष्ठांचे सूचनेनुसार घेण्यात आले. (Unusual bag found in Pune camp area; A single sensation!)

Pune Crime । कमी प्रतीचे मद्य उच्च प्रतीचे भासवून विकणारा गजाआड ; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक, गोपनीय अंमलदार  दराडे व तपास पथकाचे पोलीस हवालदार कदम हे साध्या वेशात हजर होते. त्यादरम्यान पोलीस अमलदार दराडे यांनी काळ्या रंगाची बॅग ही वेलनेस फॉरेव्हर मेडिकलच्या पायरीवर ठेऊन काही अंतरावर जाऊन थांबले. त्यानंतर त्या बॅगवर लक्ष ठेऊन होते. या काळ्या रंगाच्या बॅगची माहिती कोणी व्यक्ती ही पोलीस स्टेशनला किंवा पोलीस कंट्रोल रूम ला माहिती कळवते का नाही, हे  पाहत होते. दरम्यान, फरदीन खान या कपडे विक्रेत्यांनी लष्कर पोस्ट येथे  यांना फोनद्वारे त्या संशयित बॅग असल्याचे कळवले.  (Unusual bag found in Pune camp area; A single sensation!)

पोलीस स्टेशनला आम्ही डमी डेकॉय बाबतची स्टेशन डायरीमध्ये नोंद करण्यात आली होती. त्यानंतर उपस्थित अधिकारी यांनी बागेजवळ जाऊन  उपस्थितांना आशा प्रकारे बेवारस बॅग व अन्य वस्तू आढळून आल्यास काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.  (Unusual bag found in Pune camp area; A single sensation!)

दहशतवादी कृत्य व घातपात रोखण्याकरिता अँटी टेररिझम चेकिंग केली जाते. यातून नागरिक सुरक्षेसंदर्भात किती अलर्ट आहेत, हे पहिले जाते. तसेच त्यांना बेवारस वस्तू आढळून आल्यास नेमकं काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी जनजागृती केली जाते. अशी रंगीत तालीम ठराविक अंतराने घेतली जाते.

– अशोक कदम,  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन,पुणे

Local ad 1