Majhi Vasundhara 3.0। माझी वसुंधरा अभियानात कुंडलवाडी नगर परिषदेला पुरस्कार

Majhi Vasundhara 3.0 । नांदेड : पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश (Earth, Air, Water, Fire and Sky) या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित माझी वसुंधरा अभियान (Majhi Vasundhara Abhiyan) उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची गुणाक्रमानुसार निवड आज महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) जाहीर केली आहे. (Awarded to Kundalwadi Nagar Parishad in Majhi Vasundhara Abhiyan)

Majhi Vasundhara 0.3। माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांत कोणत्या जिल्ह्याने मारली बाजी ?

 पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यावतीने या निवडीबाबत शासन निर्णय निर्गमीत करण्यात आला आहे. या अभियानात कुंडलवाडी नगरपरिषदेला 15 हजार पेक्षा लोकसंख्येच्या गटातील विभागीय स्तरावरचे 1 कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांना विभागस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्याचा बहुमान मिळाला आहे. (Awarded to Kundalwadi Nagar Parishad in Majhi Vasundhara Abhiyan)
 
माझी वसुंधरा अभियान 3.0 हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये राबविण्यात आले. यात राज्यातील 411 नागरी स्थानिक संस्था व 16 हजार 413 ग्रामपंचायती अशा एकुण 16 हजार 824 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला. या निवडीसाठी तीन गट ठेवण्यात आले होते. यात अमृतगट, नागरी स्थानिक संस्था, ग्रामपंचायत असे गट करण्यात आले. त्या-त्या संस्थांनी केलेल्या कार्याच्या मूल्यमापनासाठी त्रयस्त यंत्रणेवर जबाबदारी देण्यात आली होती. (Awarded to Kundalwadi Nagar Parishad in Majhi Vasundhara Abhiyan)
या त्रयस्त यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रावरील कामाचे मूल्यमापन व डेस्कटॉप कामाचे मूल्यमापन करण्यात आले. या निवडीबद्दल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आनंद व्यक्त केला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) हे डेहराडून येथे भारतीय प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी काही दिवसांसाठी गेले आहेत. (Awarded to Kundalwadi Nagar Parishad in Majhi Vasundhara Abhiyan)
Local ad 1