शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन

Vinayak Mete : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे  (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झाले असून, त्यांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) अपघात झाला आहे. (Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete)

 

 

रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नसल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. (Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete)

 

 

मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (Accidental death of Shiv Sangram leader Vinayak Mete)

Local ad 1