स्मार्ट आधार पीव्हीसी कार्ड आता EMS स्पीडपोस्टने थेट घरी
QR कोड स्कॅन करून ऑफलाइन पद्धतीने तात्काळ ओळख पटविता येणार
पुणे : आधार पीव्हीसी (PVC) कार्डमुळे आता नागरिकांना ओळख पडताळणीची सोपी आणि सुरक्षित सुविधा मिळणार आहे. या कार्डावरील QR कोड स्कॅन करून ऑफलाइन पद्धतीने तात्काळ ओळख पटविता येणार आहे. (aadhaar pvc card offline verification qr code)
Lohegaon Airport। लोहगाव विमानतळावर भटक्या श्वानांचा त्रास कायम
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधार पीव्हीसी कार्ड उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यासाठी केवळ ₹५० इतके नाममात्र शुल्क आकारले जाते. हे कार्ड UIDAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा mAadhaar मोबाईल अॅपद्वारे ऑर्डर करता येते. ऑर्डर केल्यानंतर हे कार्ड EMS स्पीडपोस्ट द्वारे थेट नागरिकांच्या घरी पोहोचते.
आधार पीव्हीसी कार्डची वैशिष्ट्ये
- QR कोड स्कॅन करून त्वरित ऑफलाइन पडताळणी
- ऑर्डर संख्येवर कोणतीही मर्यादा नाही
- mAadhaar अॅपद्वारे सहज ऑर्डर करता येते
- EMS स्पीडपोस्टद्वारे जलद वितरण
- सर्व प्रकारच्या आधार कार्डांना कायदेशीर मान्यता
सर्व प्रकारचे आधार – ई-आधार, पेपर लेमिनेटेड आधार, आधार लेटर आणि पीव्हीसी कार्ड – हे कायदेशीरदृष्ट्या समकक्ष आहेत. परंतु पीव्हीसी कार्ड टिकाऊ, सुलभ वाहून नेण्याजोगे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम आहे.
नागरिकांनी कोणतेही आधार सादर केल्यावर त्याची QR कोड स्कॅन करून ऑफलाइन पडताळणी mAadhaar अॅप किंवा Aadhaar QR Scanner App द्वारे करता येते.